प्रतिनिधी: गणेश खारतुडे
पुणे (लोणी काळभोर):- पुणे सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी हद्दीतील मंगल कार्यालयाजवळ गुरुवारी (ता. 26) रोजी आपल्या मित्रांच्या लग्नाला आलेल्या आपल्या मित्रांसमवेत गप्पा मारत जात असताना भरधाव कंटेनरने धडक दिल्यांने तरुण डॉक्टरचा जाग्यावरतीच मृत्यू झाला आहे.अजिंक्य मोहन सांगळे (वय26 रा. सिंहगड रोड, पुणे)तर त्यांचा मित्र मोहित घोलप ( वय 24 रा. हडप्पसर )गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी धीरज शिवाजी काळे ( रा. माळवाडी हडपसर )यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कंटेनर चालक गंगाधर रेवण्या स्वामी (वय-22, रा. घाटबोरल, ता. होमनाबाद , जि. बिदर, कर्नाटक ) याला अटक करण्यात आली आहे,
मित्रांसमवेत बोलताना त्याने ‘आयएएस’ ,आयपीएस अधिकारी व्हायचे स्वप्नही बोलून दाखविले,
लग्रसोहळ्यातून काही वेळ बाहेर येऊ रस्त्याने थंडपेय पिवुन ते पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून पुन्हा लग्राचे ठिकाणीकार्यालयांत पायी चालत चालले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पुण्याहून सोलापुरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने मोहित घोलप व अजिंक्य सांगळे यांना पाठीमागून धडक दिल्याने ते दोघे रस्त्यावर खाली पडले. यावेळी दोघांनाही एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वीच अजिंक्य सांगळे यांचे निधन झाल्याचे सांगितले तर मोहित हा गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार चालू आहेत. सांगळे यांच्यावर मूळ गावी (बारामती – पारवडी ) या ठिकाणी अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी असंख्य लोक समूहाने उपस्थिती दाखवली अजिंक्यच्या जाण्याने एकप्रकारे गावांवरती शोककळा पसरली व सर्व स्थरातून हळ हळ व्यक्त होत होती..