रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 तर्फे कुंभारगाव दत्तक, रोटरीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक.

भिगवण: रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 तर्फे कुंभारगाव हे दत्तक घेण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे एन आयबीएम, रोटरी क्लब ऑफ वारजे, रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट आणि रोटरी क्लब ऑफ भिगवन यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभारगाव मध्ये विविध विकासकामांचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत दिनांक 12 :3: 2022 रोजी कुंभारगाव मध्ये डिस्टिक गव्हर्नर पंकज शहा व फस्ट लेडी प्रिया शहा यांच्या उपस्थितीमध्ये स्थानिक लोकांचा आरसीसी क्लब स्थापन करण्यात आला. त्यांच्या माध्यमातून गावातील विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. 12 तारखेला water ATM machine चे उद्घाटन करण्यात आले. महिलांसाठी अद्यावत स्वच्छतागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. हे दोन्ही प्रकल्प Nexteer Automotive India Pvt Ltd ह्यांच्या CSR निधीतून करण्यात आले. लक्ष्मी माता मंदिर परिसरात 25 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच प्रस्तावित environment centre चे पण उदघाटन करण्यात आले. कुंभारगाव परिसरात पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांसहित गावातील स्थानिक नागरिक व पुरातन लक्ष्मीमाता मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी या सोयी सुविधांचा वापर होणार आहे. भूमिपूजन प्रसंगी क्लबचे अध्यक्ष वसंत पाटील, सौ उर्वशी पाटील, सेक्रेटरी मनोज भाटे, प्रोजेक्ट डायरेक्टर अजित वाळिंबे, माजी अध्यक्ष विवेक दिक्षित, माजी अध्यक्षा स्वप्निला माळवदे, असिस्टंट गव्हर्नर चारू श्रोत्री, Nexteer Automotive तर्फे नागेंद्र जी Deputy GM Pune Plant, सचिन काटपाळे, रो. प्रफुल्ल भंडारी, ग्लोबल ग्रँड चे डिस्टिक डायरेक्टर संतोष मराठे, रोटरी क्लब वारजे चे अध्यक्ष हेमंत जोशी, नियोजित अध्यक्षा नक्षत्रा माणकीकर, रोटरी क्लब भिगवण चे अध्यक्ष संजय खाडे, सौ रेखा खाडे, सचिव सौ सुषमा वाघ, संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, माजी अध्यक्ष संपत तात्या बंडगर, नियोजित अध्यक्ष डॉक्टर अमोल खनावरे, कमलेश गांधी, महेश शेंडगे, प्रदीप वाकसे, संजय चौधरी, नामदेव कुदळे, संतोष सवाने,प्रदीप ताटे, औदुंबर हुलगे, प्रवीण वाघ, किरण रायसनी तसेच कुंभारगाव च्या सरपंच उज्ज्वला परदेशी, काशिनाथ धुमाळ,विठ्ठल भोई, राहुल भूई, दत्ता नागरे, संतोष वनवे, संतोष पानसरे, दामोदर धमाल, सतीश बोरावके, व ग्रामस्थ उपस्थित होते गावातील पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी बोलताना डिस्ट्रिक गव्हर्नर पंकज शहा म्हणाले, हे चालू केलेले सर्व projects हे स्तुत्य असून ग्रामस्थांना त्याचा नक्कीच फायदा होईल आणि ग्रामपंचायती तर्फे त्याची योग्य ती काळजी घेतली जाईल. ह्या करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी रोटरी डिस्ट्रिक्ट3131 सर्वतोपरी मदत करण्यात येईल, ह्या मुळे पर्यटनास चालना होऊन स्थानिक रोजगार उपलब्ध करुन ग्रामीण अर्थव्यवस्था वाढण्यास प्रयत्न होईल. या उपक्रमास लागणारा निधी रोटरी क्लब ऑफ एन आयबीएम यांच्या माध्यमातून नेक्स्टयर इंडिया प्राइवेट लिमिटेड यांच्या सी एसआर फंडातून देण्यात आला. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ पुणे एन आय बी म च्या प्रथम महिला, सौ उर्वशी पाटील यांच्या वतीने स्थानिक गोरगरीब लोकांना हॅपी फॅमिली किट चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन अजित वाळिंबे यांनी केले. गावा तर्फे सरपंच उज्ज्वला परदेशी यांनी सर्व रोटरी सदस्यांचे आभार मानले. 👉 आता उजनी जलाशय मध्ये होणार हवाई विमानतळ पुढील लिंक ओपन करून सविस्तर पहा https://youtu.be/99ET1xSrEXo

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here