भिगवन: रोटरी क्लब भिगवन च्या माध्यमातून पत्रकार दिनाचे औचित्य साधून भिगवण मराठी पत्रकार संघास रोटरी क्लब च्या वतीने संगणक भेट देण्यात आला. बदलत्या जगामध्ये काळाच्या गरजेनुसार बदल घडावा या उद्देशाने रोटरी क्लब भिगवन ने माराठी पत्रकार संघास संगणक भेट दिला जगामध्ये खूप बदल होत आहेत तर ग्रामीण भागातील पत्रकारांमध्ये सुद्धा बदल घडावेत या उद्देशाने संगणक भेट देण्यात आला यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय खाडे यांनी मत व्यक्त केले .यावेळी उपस्थित असलेले मान्यवर पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ प्रशांत चवरे सर व त्यांच्या संघातील सर्व पत्रकार बंधूव भिगवण पोलिस स्टेशनचे ए पी आय पवार साहेब, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, भिगवन गावचे सरपंच तानाजी वायसे, पराग भाऊ जाधव, डी एन काका जगताप,व रोटरी क्लब चे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत नियोजित अध्यक्ष अमोलव खनावरे माजी अध्यक्ष संपत बंडगर, रियाभाई शेख, नामदेवजी कुदळे, संजय चौधरी, कमलेश गांधी, धरनेंद्र गांधी, खजिनदार प्रदीप ताटे, उपाध्यक्ष औदुंबर हुलगे संजय रायसोनी, तुषार क्षीरसागर, रणजीत भोंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर आभार प्रदर्शन नियोजित अध्यक्ष डॉ. अमोल खनावरे यांनी केले.