आज इंदापूर येथे तहसीलदार श्रीकांत पाटील व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मराठा समाजाच्या वतीने एक निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की,रेडा गावामधील माने कुटुंब आणि पवार कुटूंब यांचा रस्त्यावरून वाद असून त्या पवार कुटूंबावर माने कुटुंबाने तीन ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले आहे. आणि आता चौथा ऑट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर पवार कुटूंबांनी २/ ६ / २०२३ रोजी शासकीय भुमीलेख अधिकारी व पोलीस बंदोबस्तात जमीनीच्या हददी कायम केल्या. सदर घटनेबाबत माने कुटुंबानी बारामती येथे आत्मदहणाचे आंदोलन केले. त्यामध्ये माने कुटूंबातील एका व्यक्तीने स्वता पेटवून घेतले. सदर प्रकरणी रेडा गावातील विद्यमान सरपंच सौ. सुनिता नानासाहेब देवकर यांचे पती व रेडा विविध कार्यकारी सोसायटी विदयमान संचालक नानासाहेब जालींदर देवकर, रेडा ग्रामपाचायतीचे विद्यमान सदस्य धनंजय मारूती गायकवाड तसेच रेडा विविधकारी सोसायटीचे संचालक आत्माराम यशवंत देवकर यांच्यावरती दिनांक. ६ / ६ / २०२३ रोजी खोटा ऑट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल केले आहेत. रेडा गावचे सरपंच सदस्य व राजकिय सामाजिक कार्यकर्ते हे वादग्रस्त रस्त्याच्या खोट्या नोंदी ग्रामपंचायतमध्ये नोंद करत नसल्याने राजकीय दोषापोटी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. आमचा आणि पवार व माने कुटुंबाचा कसलाही वादासंबधात संबंध नाही. तरीही आमच्यावर खोटेनाटे आरोप करून कोमल प्रकाश माने,लक्ष्मी रोहीदास माने, प्रकाश जनार्दन माने व त्यांची पत्नी तसेच विशाल शिवराम माने, आहिल्याजी भागवत माने, सुरेखा ओहिल्याजी माने,धनंजय हरीबा माने, गणेश सुभाष माने व इतर ३० ते ३५ जन खोटेनाटे आरोप करणे खोटया ऑटोसिटीचे गुन्हे दाखल करणे प्रशासनाला वेटीस धरणे, बेकादेशीर आदोलन करणे असे प्रकार करत आहेत. व नाहक त्रास देत आहेत. त्यामुळे ऑटोसिटी गुन्हे दाखल करणा-या सर्व जबाबदार व्यक्तिवर कायदेशिर चौकशी करावी. तसेच संबधीत गुन्हयाची सखोल चौकशी न करणा-या अधिका-याचीही सखोल चौकशी करावी. वरील प्रकारामुळे रेडा गावामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. यातून कुठलाही अनुचीत प्रकार घडू शकतो. याला सर्व प्रशासन जबाबदार राहील.तसेच रेडा गावातील मराठा समाजावरील झालेल्या खोटया ॲट्रॉसिटी व इतर गुन्हयांची चौकशी करून तात्काळ योग्य चौकशी करावी त्या वादादिवशी आम्ही जेजुरीला गेलेले CCTV फुटेज आहेत व त्या दिवशीचे मोबाईल लोकेशनसुदधा प्रशासनाने चेक करावे. दि. १८ / ७/ २०२३ वार मंगळवार १० ते ५ या वेळेत रेडा गावातील सखल मराठा बांधव रेडा गाव बंद करत आहोत.कुठलाही अनुचीत प्रकार घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल. याची नोंद घ्यावी तसेच आमच्यावर घडलेल्या आन्यायाला न्याय दयावा ही नम्र विनंती. अशा आशयाचे निवेदन आज मराठा बांधवांच्या वतीने तहसीलदार श्रीकांत पाटील व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.