रिंकू राजगुरू यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील “या” महिला शिक्षिकेचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विशेष पुरस्कार प्रदान.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेडणी येथील शिक्षिका श्रीमती सुप्रिया गेनबा आगवणे यांना मास्टर दीप इन्स्टिट्यूट अकलूज शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी राज्यस्तरीय विशेष पुरस्कार आज अकलूज या ठिकाणी प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू,आर्या घारे,देवडीकर मेडिकल सेंटरच्या संस्थापिका वसुंधरा देवडीकर,व जयसिंह शंकरराव मोहिते पाटील (चेअरमन, शंकरराव मोहिते पाटील कारखाना शंकर नगर) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात श्रीमती सुप्रिया गेनबा आगवणे यांचे काम उल्लेखनीय आहे.पुणे जिल्हा एकल शिक्षक सेवा मंचाच्या माध्यमातून आणि सहकार्यातून विविध सामाजिक उपक्रम राज्यस्तरावर राबविले आहेत.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेडनी या ठिकाणी कोरोना काळात विविध असे उपक्रम राबवून.श्रीमती सुप्रिया आगवणे व श्रीमती अनिता जाधव यांनी इंदापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.याच कामाचा सन्मान त्यांचा आज मास्तर दीप इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू यांच्या हस्ते करण्यात आला.



सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या श्रीमती सुप्रिया गेनबा आगवणे यांना मिळालेल्या राज्यस्तरीय विशेष पुरस्काराबद्दल जनता एक्सप्रेस मराठी न्यूज च्या सर्व टीम च्या वतीने हार्दिक अभिनंदन..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here