👉 मानवी भावनांचं भावविश्व सांगणाऱ्या ‘जिंदगानी’ चित्रपटाला रसिकांची पसंती
सामाजिक बांधिलकी आणि निसर्गावर आधारित असलेला ‘जिंदगानी’ हा चित्रपट नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदरचं चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल झाले आहेत. लॉकडाऊन नंतर मराठी चित्रपटसृष्टी पूर्वपदावर येत असताना मराठी चित्रपटाला रसिकांनी सुखद धक्का दिला आहे. रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन पत्रकारांसाठी व चित्रपटसृष्टीतील मान्यवरांसाठी केले होते.
निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपट पाहिला ते म्हणाले की “या चित्रपटाची कथा ही एका गावाची आणि तिथल्या गावकऱ्यांची कथा असून त्यांच्या संघर्षाची आहे. यातून निसर्गाचं जे शोषण मानव कळत नकळत करतो त्याबद्दल भाष्य हा चित्रपट करतो. मानवी भावनांचं भावविश्व सांगणाऱ्या ‘जिंदगानी’चे दिग्दर्शन आणि लेखन विनायक साळवे यांनी केले आहे तर सुनीता शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.