राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने मध्ये नावे समाविष्ट करून धान्य मिळण्यासाठी करमाळयात बहुजन संघर्ष सेनेची निदर्शने

राष्ट्रीय अन्न बहुजन संघर्ष सेनेने जिल्हा आधीकारी यांना दिले निवेदन नायब तहसीलदार जाधव यांनी स्विकारले निवेदन

प्रतिनिधी/करमाळा :बहुजन संघर्ष सेना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली बहुजन संघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कचेरी समोर जोरदार घोषना देत निदर्शने केली
या वेळेस राजाभाऊ कदम म्हणाले विभक्त रेशन कार्ड व नवी रेशन कार्ड धारकांना धान्य मिळावे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत रेशन कार्ड धारकांची नावे समाविष्ट करावेत ज्यावेळेस नागरिक नवीन रेशन कार्ड काढतात तेंव्हा त्यांना धान्य मिळत नाही म्हणून तहसीलदार साहेबंनी विषेश मोहीम राबवून करमाळा तालुक्यातील सर्व गरजू व पात्र लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करावे तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लोकांना वेळेत पेंशन मिळाली पाहिजे व तलाठी, मंडलआधीकारी यांनी निराधार, वयोवृद्ध, अपंग,विधवा यांचा शोध घेऊन संजय गांधी निराधार योजनेचे फार्म भरून घ्यावेत, तालुक्याचे आमदार संजय शिंदे या सर्व प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याने सर्व सामान्य जनता नाराज आहे नागरिकांनी आमच्याकडे हे सर्व प्रश्न सोडवन्याची मागणी केल्याने बहुजन संघर्ष सेनेने शासनाला जागे करण्यासाठी निदर्शने केली आहेत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मोर्चा काढू आसा ईशारा राजाभाऊ कदम यांनी दिला .
या वेळी तालुका अध्यक्ष अंगद लांडगे,शहर अध्यक्ष आजिनात कांबळे, शेतकरी संघटनेचे आंना सुपनर, पांड्याचे सरपंच आणारसे, आप्पा भोसले, मारुती भोसले, मचिंद्र गायकवाड, विष्णू रंदवे, महादेव भोसले, आदीक शिंदे, रामा पांडव,दादा चव्हाण,प्रेमकुमार सरतापे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here