राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी इंदापूर आयोजित कृषि प्रदर्शन व शेतकरी मेळावा हा महिला, युवा व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार. आजपासून 3 दिवस भरगच्च कार्यक्रम.

👉 महिला, युवा व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार हे प्रदर्शन.
इंदापूर:सावित्री महिला विकास संघ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथे भव्य कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.काल या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ,अमोल भिसे, तात्यासाहेब वडापुरे,विठ्ठल ननवरे,बाळासाहेब ढवळे, बाळासाहेब करगळ,शिवाजी तरंगे,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष छाया पडसळकर,उद्योजक संजय दोशी, युवा नेते अण्णासाहेब धोत्रे उपस्थित होते. आज शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता महिला मेळावा व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक रूपालीताई चाकणकर अध्यक्ष महिला आयोग महाराष्ट्र राज्य,सौ सुनंदावहिनी पवार विश्वस्त एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, प्रियाताई बेर्डे जिल्हाध्यक्ष कला साहित्य व सांस्कृतिक सेल पुणे, वैशालीताई नागवडे पुणे विभागीय अध्यक्ष एनसीपी, भारतीताई शेवाळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस, वैशालीताई पाटील माजी सभापती महिला व बालकल्याण पुणे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा खास महिलांसाठीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे शनिवार दिनांक 10 डिसेंबर रोजी युवा महोत्सव या सदराखाली तालुक्यातील युवा वर्गास योग्य मार्गदर्शन व सुसंवाद होण्याकरिता युवा महोत्सवाचे आयोजन केलेले असून शनिवार दिनांक 10 डिसेंबर रोजी लोकप्रिय खासदार डॉ.अमोल कोल्हे,लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार व अमोल मिटकरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये सांगता समारंभ व मार्गदर्शनपर तरुणांशी संवाद होणार असून या कार्यक्रमास शर्मिलावहिनी पवार अध्यक्षा शरयू फाउंडेशन ह्या उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनसाठी प्राध्यापक एस.एम खाडे सर संचालक ज्ञानदीप करिअर अकॅडमी पुणे यांचे खास स्पर्धा परीक्षा संदर्भातील मार्गदर्शन होणार आहे.या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी प्रमुख आकर्षणामध्ये रविवारी दिनांक 11 डिसेंबर रोजी भव्य शेतकरी मेळावा आयोजित केला असून या कार्यक्रमाचे उद्घाटन पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडी माळेगाव कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, सोमेश्वर कारखान्याचे पुरुषोत्तम जगताप, छत्रपतीचे प्रशांत काटे यांच्या हस्ते होणार आहे तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करण्यामध्ये दशरथदादा माने अध्यक्ष सोनई परिवार, अर्जुन देसाई अध्यक्ष नेचर डिलाईट परिवार, आबासाहेब साळुंखे माजी शास्त्रज्ञ व्हीएसआय पुणे तसेच डॉ. शिवाजी थोरात शास्त्रज्ञ सिलिकॉन अन्नद्रव्य एम डी वेदांत ग्रुप पुणे या प्रमुख दमदार व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मेळावा आयोजित केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्व शेतकऱ्यांना सहकुटुंब भेट देण्यासाठी निमंत्रित केले आहे व त्यासाठी शंभर फुटी रोड शेजारी असलेल्या नवीन तहसील कचेरी लगत पटांगणात मेळाव्यास भव्य स्वरूप दिले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here