इंदापूर:प्रभाग क्रमांक ५ व्यंकटेशनगर येथील ‘एकच निर्धार कोरोना हद्दपार’ या मोहिमेअंतर्गत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इंदापूर शहर यांच्या माध्यमातून कोरोना लसीकरण मोहीम इंदापूर शहरातील नागरिकांसाठी घेण्यात आली.लसीकरण करून घेणे हीच आत्ता सर्वांची जबाबदारी ओळखून व्यंकटेश नगर या ठिकाणी दिनांक १९ जानेवारी २०२२ रोजी पहिला दुसरा व बूस्टर डोस देण्याचा प्रारंभ संपन्न झाला.या लसीकरण मोहीम मध्ये ४२३ नागरिकांनी लसीकरण करून घेतले.
या वेळी इंदापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे ,राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष महादेव लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते वसिमभाई बागवान, साजन ढावरे ,माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे ,श्रीधर बाब्रस, इंदापूर शहर राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय अध्यक्ष विकास खिलारे,अरबाज बागवान, सोहम मोहिते, अभिषेक सुर्यवंशी, सद्दाम बागवान, स्वप्नील उतेकर ,दिपक उतेकर ,हायुल बागवान, विजय मोरे, स्वप्नील उत्तेकर ,राजू ढावरे, नदीम बागवान ,जावेद शेख, कृष्णा सुर्यवंशी, ऋषिकेश उत्तेकर ,रोहित ढावरे उपस्थित होतेे.या लसीकरण मोहीमचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस चे युवकांचे कार्याध्यक्ष वसिम भाई बागवान यांनी केले