राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराला काँग्रेसच्या मा.खासदाराच्या जावयाचा खूनाचा प्रयत्नाच्या आरोपाप्रकरणी १० वर्षाची शिक्षा.

राजकारण आणि गुन्हेगारी हे समीकरण काही नवीन नाही. राज्यातील अनेक नेतेमंडळींवर वेगवेगळे गंभीर होणे दाखल आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराला काँग्रेसच्या माजी खासदाराच्या जावयाचा खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून कोर्टाने १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.राज्यात सध्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हे काही दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर आले आहेत तर नवाब मलिक हे अद्याप तुरुंगातच आहेत, यादरम्यान राष्ट्रवादीचे राज्याबाहेरील एकमेव खासदार मोहम्मद फैजल यांना आज खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणात 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्विपचे खासदार मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे सहकारी मानले जातात. फैजल यांना यांना 2009 च्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फैजल हे 2014 पासून संसदेत या केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करत आहेत.दरम्यान फैजल आणि अन्य तीन दोषींचा जामीन न्यायालयाने रद्द केला.या प्रकरणात एकूण 23 आरोपी होते, त्यापैकी 4 आरोपींना शिक्षा झाली. फैजल यांच्यावर त्यांचे नातेवाईक मोहम्मद सलीह यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. दोषींवर प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. फैसल म्हणाले की हे राजकीयदृष्ट्या प्रेरित प्रकरण आहे आणि ते लवकरच वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करणार आहेत.
त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपात म्हटले आहे की, फैजल यांनी लोकांच्या एका गटाचे नेतृत्व केले होते ज्यांनी सलीह यांच्यावर हल्ला केला. एका शेडच्या बांधकामावरून झालेल्या वादानंतर सलीह हे गंभीर जखमी झाले.
त्यानंतर सलीह यांना केरळला नेण्यात आले, तेथे त्यांच्यावर अनेक महिने रुग्णालयात उपचार करण्यात आले. मोहम्मद सलीह हे लक्षद्वीपचे दिवंगत माजी लोकसभा सदस्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पीएम सईद यांचे जावई आहेत..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here