राष्ट्रवादीमधील पवार साहेब यांच्या टीम मधून जडेजांचा राजीनामा.. वाचा सविस्तर..

यंदा गुजरात इलेक्शनची मॅच जोरदार रंगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचा गुजरात मधील एकमेव आमदार असलेले जडेजा यांनी मात्र राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आणि दुसरीकडे पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. अशातच गुजरात विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार कांधल जडेजा यांनी आगामी राज्य निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती केल्यानंतर पक्षाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीने पोरबंदरमधील कुतियाना मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर जडेजांचा राजीनामाही आला आहे.जडेजा 2012 पासून कुतियाना येथून गुजरात विधानसभा निवडणूक जिंकत आहेत. 2017 च्या निवडणुकीत 50 टक्क्यांहून अधिक मताने जिंकुन त्यांनी भाजप आणि कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव केला होता.“होय, त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तिकीट न दिल्याचे कारण त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.” असे गुजरात राष्ट्रवादीचे प्रमुख जयंत बोस्के यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की जडेजा यांनी राज्यसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशाची अवज्ञा केली होती आणि भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदान केले होते.गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १ डिसेंबरला आणि ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. निकाल म्हणजेच मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे. एकूणच गुजरातमध्ये सुरू झालेल्या इलेक्शनच्या मॅचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव अष्टपैलू खेळाडू जडेजा यांच्या राजीनामामुळे पवार साहेबांच्या टीमला मात्र मोठा धक्का बसला आहे…

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here