राष्ट्रमाता जिजाऊ यांचा ३४८ वा स्मृतीदिन उत्साहात साजरा. ॲड.सचिन चौधरी,कू.साक्षी ननवरे यांचा विशेष सन्मान.

इंदापूर:काल दि. १७ जून २०२२ रोजी इंदापूर येथील वीरश्री मालोजीराजे भोसले स्मारक ( इंदापूर- पुणे बायपास रोड) या ठिकाणी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड इंदापूर च्या वतीने स्वराज्यप्रेरिका, स्वराज्य संकल्पिका, राष्ट्रमाता जिजाऊ यांचा ३४८ वा स्मृती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मराठा सेवा संघाच्या आचारसंहितानुसार सामुहिक जिजाऊ वंदना गाऊन करण्यात आली. यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत हे जिजाऊ चरित्र देऊन करण्यात आले. जिजाऊ स्मृती दिनानिमित्त विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले यामध्ये जिजाऊ वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या प्रतिक्षा चंगेडिया,बारामती यांना जिजाऊ प्रतिमा,जिजाऊ चरित्र पुस्तक व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच शिवराय वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेला बालशिवबा हर्शील चंगेडिया याचाही शिवराय यांची प्रतिमा, जिजाऊ चरित्र व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. ज्याप्रमाणे जिजाऊ यांनी शिवबास घडविले व त्यांची किर्ती साता समुद्रापार नेली अगदी त्याचप्रमाणे वर्षा ननवरे मॅडम व रविंद्र ननवरे सर या दाम्पत्यांनी त्यांची पाल्या साक्षी ननवरे हिला खेळाला प्राधान्य देऊन हॅंडबॉल या खेळात उतरवले व साक्षी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे ही बाब अभिमानस्पद असल्याने ननवरे दांपत्याचा सन्मान हा जिजाऊ स्मृती सन्मान हा पुरस्कार देऊन करण्यात आला. त्याचबरोबर जेम्स लेन प्रकरणात इंदापूर येथील ४५ शिवप्रेमींवरील खटल्याची बाजू मा. न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण मांडली व सदर खटला निकालात काढल्याबद्दल ऍडव्होकेट सचिन चौधरी साहेब यांना जिजाऊ स्मृती कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत ( बापू) पवार यांची निवड ही हिंगणेवाडी वि. कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी इंदापूरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. पंकज गोरे सर, डॉ. सपकळ सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिजवडी चे शिक्षक रविंद्र तनपुरे सर,वकीलवस्ती ग्रामपंचायत सरपंच सुभाष भोसले, मराठा महासंघ इंदापूर चे शहराध्यक्ष प्रशांत ( मामा) उंबरे, रणजित बाबर, प्रशांत पाटील, विजयकुमार फलफले सर, गलांडवाडी चे सामाजिक कार्यकर्ते  भगवान महाडिक,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मा. तालुकाध्यक्ष उमेश घोगरे, संदेश कदम सर,  विशाल मेंगडे,संभाजी ब्रिगेड इंदापूर तालुकाध्यक्ष मकरंद जगताप,शिवश्री संतोष ढोपे,शिवश्री प्रवीण वाणी, दिपक चव्हाण, भारत चौधरी, गणेश काळे, सदानंद गायकवाड, कुथवळ साहेब,फलफले उद्योग समूहाचे संस्थापक ज्ञानेश्वर फलफले, इंदापूरचे युवा उद्योजक  अल्केश ढमढेरे,  तुषार घोगरे,  सोमनाथ घोगरे,  विजय आवटे, इंदापूर तालुका कॉंग्रेस सरचिटणीस  निवास शेळके, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा जयश्री गटकूळ मॅडम, जिजाऊ ब्रिगेड इंदापूर शहराध्यक्षा पूजा शिंदे,जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्षा राधिका शेळके,मराठा सेवा संघ पुणे जिल्हाध्यक्ष राहुल घोगरे, मराठा सेवा संघ इंदापूर शहराध्यक्ष राहुल गुंडेकर, मराठा सेवा संघ इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महेश कोरटकर, मराठा सेवा संघ इंदापूर शहर उपाध्यक्ष शिवश्री प्रमोद देशमुख, मराठा सेवा संघ इंदापूर कोषाध्यक्ष प्रमोद जगताप,मराठा सेवा संघ इंदापूर शहर कार्याध्यक्ष प्रतिक झोळ, मराठा सेवा संघ इंदापूर शहर प्रसिद्धी प्रमुख पै राजन पवार, मराठा सेवा संघ इंदापूर शहर संघटक किरण शिंदे, मराठा सेवा संघ संपर्क प्रमुख गणेश रणदिवे, शिवश्री प्रज्वल गायकवाड, व शिवशंभू भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश रणदिवे यांनी, प्रास्ताविक राहूल घोगरे यांनीतर आभार प्रदर्शन पूजा शिंदे यांनी केले. जिजाऊ स्मृती दिन यशस्वी पार पाडण्यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड इंदापूर च्या सर्व पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here