राष्ट्रपिता जोतिबा फुले यांच्या पुतळ्यावर शाईफेक करून विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करा-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मागणी.

इंदापूर; आज इंदापूरात तालुक्यातील काही प्रमुख ओबीसी नेत्यांनी इंदापूर तहसीलदारांकडे एक निवेदन दिले आहे या निवेदनामध्ये यवतमाळ येथील महात्मा फुले चौक येथे असलेल्या भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यावर शाईफेक करून विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करा अशी आग्रही मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने तसेच ओबीसी समाजातील बांधवांनी केली.याबाबत सविस्तर वृत्त असे की ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन यवतमाळ येथील विटंबनाबाबत सविस्तर माहिती दिली की, दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीच्या महिन्यातच महात्मा फुले चौकात यवतमाळ येथील राष्ट्रपिता फुले यांच्या पुतळ्यावर दुर्बुद्धी असलेल्या समाजकंटकाने शाई फेकून विटंबना केली आहे. यामुळे ओबीसी समाजासह सर्वच समाजाच्या भावना दुखावल्या गेलेले आहेत. याबाबत इंदापूर तालुक्यातील समस्त ओबीसी समाजाने निषेध केला आहे. याबाबत निवेदनात असे म्हणले आहे की,वास्तविक पाहता ज्या महामानवाने या देशातील शिक्षणाचा पाया घातला बहुजनाला शिक्षणाच्या वाटा खुल्या करून दिल्या,समता प्रस्थापित करण्यासाठी काम केले,सत्याचा शोध घेण्यासाठी सत्यशोधक चळवळ उभा केली अशा महा मानवाच्या पुतळ्याच्या पाठीवर शाई फेकण्यार्या व्यक्तीचा आणि वृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत अशा मानवतावाद विरोधी प्रवृत्तीस त्वरित शिक्षा व्हावी त्याचप्रमाणे स्वतंत्र चौकशी पथकाद्वारे चौकशी करून लवकरात लवकर योग्य कायदेशीर कारवाई करावी म्हणजेच भविष्यात असे गुन्हे घडणार नाहीत अशी ही विनंती तहसीलदारांना ओबीसी समाजातील नेत्यांनी निवेदनाद्वारे दिली.यावेळी अखिल भारतीय समता परिषदेचे पुणे जिल्हा संघटक अशोक देवकर म्हणाले की अशा दुर्बुद्धी असलेल्या समाजकंटकाला त्वरित पोलिसांनी पकडावे व कायदेशीर प्रक्रिया राबवावी अन्यथा आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करू अशी भावना व्यक्त केली.यावेळी इंदापूर शहरासह तालुक्यातील प्रमुख ओबीसी नेते ऍड. कृष्णाजी यादव, पोपट शिंदे, बाळासाहेब व्यवहारे,अनिल राऊत, दत्ताभाऊ जगताप, रमेश आबा शिंदे तथा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here