राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाल्याबद्दल निमगावचे सुपुत्र विजय भोंग यांचा सन्मानपञ देवून विशेष गौरव.

भोंग प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार सोहळा संपन्न
निमगाव केतकी: संत सावतामाळी मंदिर निमगाव केतकी येथे भोंग प्रतिष्ठानच्यावतीने भोंग परिवारातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करून महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी धनश्री भोंग हीने अभंग म्हणून उपस्थितांची मने जिंकली.
पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल सन्मानपञ देवून विजय उत्तम भोंग, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सन्मानपञाचे वाचन राजकुमार भोंग यांनी केले. त्याचबरोबर मीना भोंग उपसरपंच निमगाव केतकी, मच्छिंद्र भोंग उपसरपंच शेळगाव, सुधाकर भोंग हिंदी भाषारत्न पुरस्कार, सेट परीक्षा उत्तीर्ण वर्षा भोंग व अश्विनी भोंग, नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवलेले श्रेयशी भोंग, अर्णव भोंग, सातारा सैनिक स्कूल प्रवेश मिळवलेला विश्वजीत भोंग, प्रशांत भोंग यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मा.सभापती अंकुश जाधव , दत्ताञय शेंडे यांनी मनोगते व्यक्त केली.पं.स. सदस्य देवराज जाधव , मा. उपसरंच तात्यासाहेब वडापुरे , राष्ट्रवादी महिला अध्यक्ष छाया पडसळकर, मा.जि.प.स. शालनताई भोंग, ॲड सचिन राऊत, राजू जठार, ॲड संदिप शेंडे, तुषार खराडे, अक्षय पाटील, संदिप भोंग, काशीनाथ भोंग, पोलिस उपनिरिक्षक अनिल भोंग , दिलीप भोंग , तालुका कृषी अधिकारी आनंद भोंग , सहा.अभियंता छगन भोंग , परशुराम भोंग, सहा. सहकारी अधिकारी , स्वप्निल भोंग RTO , पांडुरंग भोंग निवृत्त नायब तहसिलदार प्रमुख उपस्थित होते.
सत्कार समारंभाचे प्रास्तविक माणिक भोंग यांनी केले. डॉ.सतिश भोंग, कांतीलाल भोंग, मारुती भोंग, अंकुश भोंग, सुदाम भोंग, प्रशांत भोंग, ग्रा.सदस्या अर्चना भोंग, रिना भोंग , सुगंधा भोंग , वर्षा भोंग , अर्जुन भोंग , शंकर भोंग ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू भोंग , उमेश भोंग, बाळू भोंग, सतेश भोंग यांनी विशेष सहकार्य केले. सुञसंचालन संतोष हेगडे तर ॲड.सुभाष भोंग यांनी आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here