रामा ॲग्रोटेक संलग्न शिवम इंटरप्राईजेस या जैविक सल्ला केंद्राचे उत्साहात उद्घाटन,पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग समाधानी.

इंदापूर: रामा ऍग्रोटेक कंपनीच्या शिवम इंटरप्राईजेस या जैविक सल्ला केंद्राचे उद्घाटन काल अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडले.पंचक्रोशीतील शेतकरी यांच्या उपस्थितीत औपचारिक रित्या हे उद्घाटन झाले. सदरचे सल्ला केंद्र हे कदम गुरुकुल शाळेच्या समोर असलेल्या ठिकाणी सुरू झाले आहे. या उद्घाटन प्रसंगी रामा ॲग्रोटेकचे राम चव्हाण सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की “रामा ॲग्रोटेक कंपनी ही भारतात अग्रेसर कंपनी असून यापुढेही शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे निघेल याकरता आम्ही तत्पर राहू. त्याचप्रमाणे ते पुढे म्हणाले की शिवम इंटरप्राईजेसच्या माध्यमातून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल असे ते म्हणाले.यावेळी रामा ऍग्रोटेक कंपनीचे प्रतिनिधी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना डाळिंब,द्राक्ष, केळी, ऊस, पेरू,सिताफळ तसेच सर्व तरकारी पिकांविषयी मार्गदर्शन केले.यानंतर चर्चासत्राचा कार्यक्रम उपस्थित शेतकरी व रामा ॲग्रोटेक कंपनी यांचे अधिकारी वर्ग यांच्यामध्ये झाला.शेतीमधील विविध अडचणीवर चर्चा करून त्यावर कशा पद्धतीने मार्ग काढता येईल या विषयांवरती चर्चा करण्यात आली. सदरच्या चर्चेनंतर शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी शिवम इंटरप्राईजेसचे मालक रणजीत सुळके म्हणाले कि, “रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून मला शेतकऱ्यांची जेवढी सेवा तेवढी मी करेन, रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्याचे काम मी करेन.आजपर्यंत भैरवनाथ ट्रान्सपोर्ट व्यवसाय तसेच शेतकऱ्यांचा मालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतकरी ते मार्केट असं थेट व्यवसायही मी करत आहे. आता नव्याने सुरू केलेल्या शिवम इंटरप्राईजेस च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये ज्यादा उत्पन्न काढता येईल व त्याकरिता मी सदैव प्रयत्नशील राहील, शेतकऱ्यांचे रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य समजतो असे रणजीत सुळके म्हणालेयावेळी सोलापूर, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी वर्ग उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला.आधुनिक जैविक तंत्रज्ञानाची जोड शेतीमध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी रामा ॲग्रोटेक कंपनीच्या जैविक उत्पादनांची निवड करणार असा ठाम विश्वास शेतकऱ्यांनी दाखवला.
पुणे, नगर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यास याबद्दल मार्गदर्शन हवे असेल तर त्यांनी मला संपर्क करावा असे आवाहन रणजीत सुळके यांनी केले. मार्गदर्शनासाठी 9696239191 या नंबरवर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यायचे असल्यास कदम गुरुकुल इंदापूर समोरील असलेल्या शिवम इंटरप्राईजेस येथे संपर्क साधावा असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाविषयी रामा ॲग्रोटेकचे राम चव्हाण, नितीन भुजबळ, दिपक झगडे तसेच दिपक जाधव, गणेश काळदाते, आबासाहेब तनपुरे यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here