👉 राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेमध्ये राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूर यांच्या विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल हलगीच्या तालामध्ये खेळाडूंची स्वागत करण्यात आले.
इंदापूर: क्रीडा युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित पुणे विभागीय शालेय ज्युदो स्पर्धा दिनांक 23 डिसेंबर 2022 या शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूरचे अजिंक्य अरुण नरुटे 30 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवून अमरावती या ठिकाणी होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड झाली. कुमारी सानिया संजय माने 72 किलो वजन गटामध्ये सिल्वर मेडल राधिका माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री अरविंद (तात्या) वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री अरविंद तात्या वाघ यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहली बद्दल विद्यार्थ्यांशी हितगुंज केली व खेळा बरोबर अभ्यास लक्ष द्यावे आपल्या जीवनामध्ये चांगले करियर घडवण्याचं मार्गदर्शन केले .या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रेय दडस सर श्री नानासाहेब लंबाते श्री अशोक कुलकर्णी श्री नानासाहेब देवकर श्री विनय थोरात श्री सचिन जाधव श्री नितीन भिसे सौ.शकीला सय्यद सौ.सविता पांढरे श्री.तानाजी कचरेश्री. हनुमंत जाधव श्री.माणिक तानवडे श्री.संजय चव्हाण उपस्थित होते. राधिका विद्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक राष्ट्रीय कुस्ती पंच श्री.शरद झोळ यांचे मार्गदर्शन लाभले हा कार्यक्रमास सर्व विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुनिता गलांडे यानी केलेअभार शरद झोळ यांनी केले.
Home Uncategorized राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूरच्या विद्यार्थ्यांची हलगीच्या तालामध्ये स्वागत. अरविंद तात्या वाघ यांच्या...