इंदापूर : प्रतिनिधी दि.29/6/23
राज्यात अजूनही समाधानकारक असा पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र समाधानकारक पाऊस होऊन, राज्य सुजलाम सुफलाम व्हावे व शेतकरी सुखी रहावा, असे साकडे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी आज गुरुवारी (दि.29) घातले.
आषाढी एकादशी निमित्त हर्षवर्धन पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. हर्षवर्धन पाटील हे गेली 35 वर्ष न चुकता आषाढी एकादशीला पंढरीची वारी करीत आहेत. नुकताच राज्यात काही भागात पाऊस सुरू झाला आहे, मात्र अनेक भागात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे चांगला पाऊस होऊन सर्वत्र सुख, शांती, समाधान निर्माण होऊ दे, अशी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना केली.
आमचे घराण्याला वारकरी संप्रदायाची परंपरा असून, सदरची परंपरा आम्ही पुढे चालवीत आहोत असे नमूद करून त्यांनी सांगितले की, पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील अद्वितीय असा उत्सव आहे. विठ्ठल हे साऱ्या विश्वाचे दैवत आहे.