राज्य सरकारी कर्मचारी दिपाली राऊत यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा- शेतकरी संघटना.

फेसबुक साइटवर शेतकऱ्यांबद्दल अपशब्दाचा वापरणाऱ्या दिपाली राऊत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे निवेदन शेतकरी संघटनेने इंदापूरचे नायब तहसीलदार अनिल ठोंबरे व इंदापूर पोलीस स्टेशन यांना दिले आहे. या व्यक्तीचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी सध्या महाराष्ट्रात जोर धरू लागली आहे. इंदापूरमध्ये शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.सर्वांना जगवणारा माझा शेतकरी राजा आहे आणि असे शेतकऱ्यांवरच कोणी बोलत असेल तर आम्ही कदापी सहन करणार नाही असे निवेदनात मत शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष सचिन कोथमीरे यांनी केले आहे.दिपाली राऊत या राज्य कर्मचारी यांनी शेतकरी बांधवांबद्दल कमेंट करताना “तुम्ही शेतकरी लय उपटून भारे बांधून राहिले लोकांकरिता,अरे तुमचे पोट तुम्हाला भरता येईना भीक मागे..”असा खालच्या पातळीवर शब्द वापरल्याने आमच्या शेतकरी बांधवांच्या दुखावर मीठ लावण्याजोगे वक्तव्य केले असून याचा आम्ही निषेध करतो,व या शासकीय महिला कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा सात दिवसात दाखल व्हावा नाहीतर आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष सचिन कोथमीरे, गुलाब आबा फलफले, पुणे जिल्हा शेतकरी संघटना उपाध्यक्ष, पुणे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख संतोष तावरे ,मंगेश वामन घाडगे बारामती शेतकरी संघटना ,तुकाराम शंकरराव निंबाळकर( आबा) उपाध्यक्ष इंदापूर तालुका शेतकरी संघटना ,धनाजी धोंडीबा किरकत पुणे जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष शेतकरी संघटना, हिरामण पुंडलिक जाधव संपर्कप्रमुख शेतकरी संघटना, अरुण दत्तात्रेय पवार शेतकरी संघटना, किरण मदने तालुका अध्यक्ष बारामती शेतकरी संघटना, असे बहुसंख्य शेतकरी संघटनेचे नेते व शेतकरी बांधव उपस्थित होते.


Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here