राज्यात चार ते पाच महिन्यापासून सातत्याने पाऊस पडत असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,खानदेश येथील शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकवलेल्या पिकांचे नुकसान झालेल्या असून शेतकरी आता संकटात सापडला आहे हीच गोष्ट शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी इंदापूर काँग्रेसच्या वतीने इंदापूर तहसीलदार यांना एक लक्षवेधी निवेदन दिले आहे.राज्यात ओला दुष्कळ जाहिर करून दिवाळीपुर्वी भरीव मदत जाहिर करावी अशी प्रमुख मागणी या निवेदनात केली आहे त्याचप्रमाणे काल दिलेल्या निवेदनात खालील मुद्दे अधोरेखित केले आहेत.
१) तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करा.
२) हेक्टरी ७५ हजार रूपये मदत करावी.
३) शेतमजुरांना विशेष अनुदान जाहिर करा.
४) मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे जागतिक भुक निर्देशंकात भारताची घसरण झाली असून जगात १२१ देशांपैकी १०७ व्या क्रमांकावर आपला देश आला आहे हे अतिशय खेदजनक आहे.भारताची हि प्रतिमा सुधारण्यासाठी शेतकरी हिताचे व्यापक धोरण केंद्र सरकारकडून आखण्यात यावेत.
वरील मागण्याचा सरकारने सहानुभुती पुर्वक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. या सर्व मागण्यांसाठी स्वप्निल सावंत-अध्यक्ष, इंदापूर तालुका काँग्रेसे कमिटी सदस्य, पुणे जिल्हा विद्युत वितरण दक्षता समिती यांनी तहसीलदार इंदापूर यांना निवेदन देऊन एक शेतकऱ्यांसाठी लक्षवेधी मागणी केली आहे.यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, जिल्हा सरचिटणीस जाकीर भाई काजी , शहराध्यक्ष चमनभाई बागवान, किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ संतोष होगले, खजिनदार भगवान पासगे ,तालुका सरचिटणीस श्रीनिवास शेळके, महादेव लोंढे, अनुसूचित जाती जमाती विभागाचे तालुका अध्यक्ष युवराज गायकवाड, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष नाशिर शेख,बंडलकर आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.आता पुढील काळात यावर शासन गांभीर्याने विचार करून काही मदत करते का याकडेच सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.