राज्यात आज ( गुरूवारी ) तब्बल 23 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद तर 1179 नव्या कोरोनाबाधितांची भर.

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे.राज्यात आज 1179 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 615 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 65 लाख 375 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे.राज्यात आज 23 ओमायक्रॉनबाधितांची नोंदराज्यात आज 23 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 88 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 42 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 17 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7 हजार 897 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 76 हजार 373 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 899 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 81 , 17, 399 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
कोरोनाच्या 7 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची नोंद
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, देशात आता ओमायक्रॉनबाधितांची संख्याही वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 7 हजार 495 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 434 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 236 रुग्ण समोर आले आहेत. जाणून घेऊयात देशभरातील कोरोनाची सद्यस्थिती… केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 78 हजार 190 आहे. तसेच या महामारीमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 4 लाख 77 हजार 759 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (बुधवारी) 6 हजार 960 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 8 हजार 926 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here