इंदापूर (प्रतिनिधी:रसूल पठाण)- इंदापूर तालुक्यातील कौठळी या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली १४.५२ कोटी रकमेची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत.या कामांचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार (दि. १२) सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका सोशल मिडिया प्रमुख हामा पाटील यांनी दिली. या भागातील उपेक्षित रखडलेली कामे मार्गी लागली आहेत. कौठळी -पोंदकुलवाडी – इंदापूर या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तब्बल सहा कोटीचा निधी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपलब्ध करून दिला आहे.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, माजी सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.त्याचप्रमाणे कौठळी गावच्या सरपंच नंदाताई चोरमले, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस वसंतराव मारकड, उपसरपंच सुनील खामगळ, ग्रामसेवक संतोष माहिते आदी उपस्थित राहणार आहेत.
Home Uncategorized राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते कौठळी येथे 14.52 कोटी रु.च्या विकासकामांचे उद्घाटन...