राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सहकाऱ्यांच्या समवेत रंग खेळत घेतला धुलिवंदनाचा आनंद

पुणे: आज धुलीवंदन म्हणजेच धुळवड हा सर्वांच्याच आवडीचा हा सण! लहान मुलांच्या पासून ते वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत उत्साहात हा सण देशभरात साजरा केला जातो. या सणाला आनंदाचे, चैतन्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. आज नेहमीप्रमाणे तळजाई टेकडी येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा पदभ्रमंती साठी गेले असता, त्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या समवेत धुळवड खेळण्याचा आनंद लुटला.नेहमीच आपल्या वेगळेपणाची व माणुसकीचा विशेष बाज असणारे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सतत लोकांच्या मध्ये जाऊन काम करताना, आंनद व्यक्त करताना व खेळाडूंच्या समवेत मैदानात उतरून खेळताना सुद्धा दिसून येतात. लोकांच्या सोबत जोडली गेलेली नाळ अतिशय घट्ट आहे. आज नागरिकांच्या समवेत धुलीवंदन खेळताना मामांच्या चेहऱ्यावरील आंनद सहज दिसून येत आहे.यावेळी धुळवड खेळत असताना कोरड्या रंगाचा वापर करा. पाण्याचा अपव्यय टाळा.नैसर्गिक रंगांनाच प्राधान्य द्या.आनंदाने होळी खेळूयात असे आवाहन करत सर्वांना राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी धुलीवंदन च्या शुभेच्छा दिल्या. 👉 उजनी धरणावर होणार विमानसेवा सुरू ही बातमी सविस्तर पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा…👇👇👇👇  https://youtu.be/99ET1xSrEXo👈👈👈
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here