प्रतिनिधी: इंदापूर येथील शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती इंदापूरच्या सौ. छाया गेणा धापटे यांचा समस्त धापटे परिवार यांच्यावतीने सेवापूर्ती कार्यक्रम निमित्त ग्रंथतुला कार्यक्रम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व त्यांच्या सुविद्यपत्नी सारिकाताई भरणे यांच्यावतीने साई गोल्डन या कार्यालयात संपन्न झाला.कार्यक्रमापूर्वी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सौ. छायाताई धापटे यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार केला.यावेळी पिंटू काळे, महेंद्र रेडके, पांडुरंग मारकड, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षणाधिकारी बामणे व इतर शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली. तर प्रास्ताविक प्रा. गेणा धापटे सर यांनी केले.सेवापूर्ती नंतर सौ. छाया धापटे यांचा सत्कार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व सारिकाताई भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला.यानंतर इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य पाटील यांनीही सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. कांदलगाव केंद्र शाळा, बावडा बीट केंद्र शाळा, इंदापूर केंद्र शाळा ,स्वाभिमानी शिक्षक परिवार, जय भवानी गड प्रतिष्ठान लाखेवाडी च्या चित्रलेखा ढोले यांनी सत्कार केला. तसेच तालुक्यातील विविध केंद्र शाळेच्या शिक्षक वर्गाने धाकटे मॅडम यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.सौ. छाया धापटे यांचे डीएड १९८२ एथल गार्डन अध्यापिका विद्यालय येथे झाले.१९८३ साली धापटे गेना तुळशीराम यांच्याशी विवाह झाला. १९८३साली विवाहनंतर पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळगाव माळेवस्ती येथे रुजू झाल्या. १९८७ ला इंदापूर शाळा नंबर १ येथे बदली. विवाह नंतर नोकरी करत बी. ए, एम. ए. पूर्ण केले नंतर बी ए. पूर्ण केले. उपशिक्षक म्हणून २६ वर्ष सेवा केली. केंद्रप्रमुख म्हणून ४ जानेवारी २००९ रोजी प्रमोशन मिळाले त्यानंतर विस्ताराधिकारी म्हणून बावडा, इंदापूर बीट येथे अशी एकूण ३९ वर्षे सेवा केली. यासह सेवेत अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यांच्या हस्ते कोणी डॉक्टर, इंजिनिअर, वकील झाले तर कोणी शेतकरी झाले सन २०१६ साली आदर्श शिक्षक तालुका पुरस्कार पंचायत समिती इंदापूर यांच्या वतीने देण्यात आला. २००३ सालीआदर्श शिक्षक जिल्हा जिल्हा पुरस्कार जिल्हा परिषद पुणे, २०१५ गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्कार केंद्रप्रमुख संघ यांच्या वतीने देण्यात आला. २०१८साली पंचायत समिती आदर्श केंद्र पुरस्कार. २०१७ आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार अवसरी केंद्र यांच्या वतीने देण्यात आला २०१९-२० कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान तर्फे सन्मानचिन्ह, २०२०-२१ महिला दिन सन्मानचिन्ह, सन २०२१ रोटरी क्लब तर्फे सन्मानचिन्ह ,२०२०-२१ कोवीड योद्धा सन्मानचिन्ह, २०२० शिक्षका तर्फे मानपत्र अशा पद्धतीने३९ वर्षाचा त्यांचा सेवा कार्यकाळ संपन्न झाला.या कार्यक्रमाप्रसंगी, नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, गट शिक्षणाधिकारी बामणे, क्रीडा अधिकारी चावले, वसंत फलफले
चेअरमन शिक्षक सोसायटी, ज्ञानदेव बागल अध्यक्ष शिक्षक समिती, नानासाहेब नरुटे अध्यक्ष शिक्षक संघ, सुहास मोरे
अध्यक्ष मागासवर्गीय शिक्षक संघटना,सहदेव शिंदे
अध्यक्ष इप्टा संघटना,संभाजी आजबेअध्यक्ष केंद्रप्रमुख संघटना तसेच मान्यवर धापटे परिवार उपस्थित होते.