राज्यमंत्री दत्तामामा भरणेंच्या हस्ते विकासकामांचा धूमधडाका सुरूच.. उद्या होणार 30 कोटी 80 लाख रु.च्या कामांचे उद्घाटन….. तालुक्याचे लक्ष उद्याच्या सभेतील चौफेर फटकेबाजीकडे.

इंदापूर: सध्या राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका जोरात चालू आहे.उद्घाटन झाल्यानंतर सभाही जोरात होतात. गेल्या आठवड्यातच कौठळी येथील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांनंतर आता इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी व पिटकेश्वर येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्या (गुरुवार दि.१७) ३० कोटी ८० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न होणार असून सायंकाळी ५.१५ वाजता निरवांगी येथे जाहीर सभा होणार आहे. इंदापूर तालुक्यातील कौठळी आणि त्यानंतर इंदापूर येथील एका वाढदिवसाच्या ठिकाणची तुफानी सभा गाजवल्यानंतर आता तालुक्याचे लक्ष उद्या होणार्‍या निरवांगी मधील सभेकडे लागले आहे,त्यामुळे आता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उद्याच्या सभेत काय बोलतील? याची उत्सुकता कायम राहिली आहे.
उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर हे असणार आहेत.पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर, युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदरील निधीच्या माध्यमातून निमगाव केतकी – निरा नरसिंहपुर रस्ता,निरवांगी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रसूतिगृह, प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय अधिकारी निवासस्थान, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती, बी.के.बी.एन ते राऊत रस्ता काँक्रीटीकरण, निरवांगी ग्रामपंचायत कार्यालय इमारत, निरवांगी येथील पाणी टाकी, खुली व्यायाम शाळा या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here