राज्यपालांच्या हस्ते हर्षवर्धन पाटील यांना नवभारत के शिल्पकार पुरस्कार प्रदान! मुंबईत शानदार सोहळा संपन्न.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शिक्षण क्षेत्रातील मधील अतुलनीय आणि उत्कृष्ट कार्याबद्दलचा ” नवभारत के शिल्पकार पुरस्कार – 2024 ” हा पुरस्कार मुंबईत शनिवारी (दि.13) झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला.नवभारत व नवराष्ट्र वृत्तपत्र समूहाच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकच्या कॉफी टेबल बुक अनावरणासाठी आयोजित कार्यक्रमात पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांना सदर पुरस्कार राज्यपालांचे हस्ते प्रदान करण्यात आला. गेली 35 वर्षांपासून हर्षवर्धन पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेच्या सहसचिवापासून ते विद्यापीठाच्या कुलपती पर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन सदरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here