राजाभाऊ सरवदे व बापूसाहेब जगताप एकत्र आल्यामुळे कुर्डुवाडीत जल्लोष,आरपीआय आठवले गटाची ताकद वाढणार.

काल दिनांक 13 जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष सोलापूर जिल्ह्याची मोडलिंब येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये विविध महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये रिपाइं आठवले गटाचे राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे व पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष बापूसाहेब जगताप यांचा कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सोलापूर जिल्ह्याचे रिपाई आठवले गटाचे मोठे नेते एकत्र आल्यामुळे कुर्डूवाडीमध्ये देखील जल्लोष करण्यात आला.कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणुकीमध्ये देखील राजाभाऊ सरवदे व बापूसाहेब जगताप एकत्र आल्यास आरपीआय आठवले गटाची ताकद वाढणार आहे.त्यामुळे कुर्डूवाडीमधील रिपाई आठवले गट कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.कुर्डूवाडीतील ज्येष्ठ व युवा रिपाई आठवले गटांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.या झालेल्या बैठकीमध्ये प.म.सचिव नागनाथ ओहोळ,जिल्हा सरचिटनीस शामसुंदर गायकवाड़, माढा तालुकाध्यक्ष मारूती (राया) वाघमारे ,अमर बडेकर ,काळे गुरूजी यांची सदिच्छा भेट झाली.
यावेळी सोलापुर शहर संपर्कप्रमुख समिर नदाफ,स्वप्निल ओहोळ,अजिंक्य वाघमारे,सुरेश ताकतोडे,सतीश ओहोळ,नितीन ओहोळ,अरविंद ओहोळ,किरन माने,सहदेव माने,वैभव ओहोळ संकेत गाडे आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here