शांत,संयमी,कणखर, कल्पक चारित्र्यसंपन्न युवा नेतृत्व राजवर्धन दादा पाटील.

👉 काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर,आपले दादा बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्व देतात.दुरदृष्टीने झपाटुन काम करणारं गतिमान नेतृत्व म्हणजेच राजवर्धन पाटील उर्फ दादासाहेब..
दिनांक १ फेब्रुवारी इंदापूर तालुक्यातील युवकांचे आधारस्तंभ व निरा-भिमा कारखान्याचे संचालक इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोअरम कमिटीचे प्रमुख राजवर्धनजी पाटील यांच्या २७ व्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी शेतक-यांन साठी गोरगरीबांना मदत करणारे तसेच युवकांसाठी अहोरात्र झटणारे, लहानपणापासून राजकारण व समाजकारणाचे बाळकडू घरातुनच मिळालेले युवा नेतृत्व मा.राजवर्धन हर्षवर्धन पाटील ऊर्फ दादा यांचा आज वाढदिवस.युवा नेते राजवर्धन पाटील यांचे वडील म्हणजे ज्येष्ठ नेते माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री मा.हर्षवर्धन पाटील व आई भाग्यश्री हर्षवर्धन हे राज्याचे अनेक वर्षे मंत्री होते. विविध खात्याचे मंञी होते त्यांना सहकारातील दांडगा अनुभव असलेले व ज्यांनी सहकार रुजवला,वाढवला व सहकार क्षेत्राला नावलौकिक मिळवून दिले असे सर्व सामान्यांचे व शेतकऱ्यांचे नेते अशी त्यांची ओळख आहे.त्यांच्याकडूनच त्यांच्या मुलाला म्हणजेच युवा नेते मा राजवर्धन पाटील यांना राजकारणाचा बाळकडू मिळाले आणि राजवर्धन दादा निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे कमी वयात संचालक झाले.आणि त्यांच्यावर ही जबाबदारी पडली.काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संत वहातात अवघा इंदापुर तालुका व उजनी व निरा पट्ट्याला चिंब करणारा एक युवा नेता जर कोण असेल तर, ते मा.युवा नेते राजवर्धन पाटील होय.
कामाच्या कार्यपध्दतीमुळे युवकांमध्ये व ज्येष्ठांमध्ये त्यांच्या विषयी वेगवेगळ्या अस्मिता पाहायला मिळत आहे अशा शांत, संयमी,मितभाषी,कणखर, कल्पक,चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून राजवर्धन दादांची ओळख.युवकांच्या हितार्थ निर्णय, पारदर्शकता,कर्तव्यदक्ष, युवासंग्रह,पक्ष संघटनेसाठी केलेले काम आणि अनेक निष्ठावंत व जुन्यापदाधिका-यांना बरोबर घेऊन कार्यकरणारे सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्यसंपन्नता लाभलेले एक असामान्य नेतृत्व म्हणजेच राजवर्धन पाटील ऊर्फ दादासाहेब होय.
सुशिक्षित बेरोजगारांच्या चळवळीसाठी व व्यक्तीमत्वासाठी लागणार्‍या पट्टीतील या अनेक निकषांशिवाय संयमी, स्पष्टवक्तेपणा, मनमिळावू स्वभाव,कामगारसेवेसाठी सदैव तत्पर आणि महत्वाची बाब म्हणजे खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्टवक्ते नेते म्हणजे राजवर्धन पाटील होय.
दुरदृष्टीने झपाटुन काम करणारं गतिमान नेतृत्व! त्यांच्यासोबत काम करतांना वेगळीच उर्जा मिळते. त्यांनी जेंव्हा पासुन ग्रामविकासाची जबाबदारी स्विकारली आहे, त्या प्रत्येक जबाबदारीत सतत जागृत असणार नेतृत्व राजवर्धनदादा यांच्यात पाहावयास मिळते युवक संघटनेच्या माध्यमातुन तालुकाभर दांडगा संपर्क. असुन व्यक्तीमत्व सतत चर्चेत असते.
राजवर्धनदादा यांच्या बरोबर काम करतांना अनेक अनुभव मिळाले, मार्गदर्शन मिळाले. युवकांचे प्रश्न जाणणारा नेता म्हणुन शेतक-यांचा कैवारी राजवर्धनदादा यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. मग विजेचा प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल पर्यायी मदत असेल कोणतेही काम हातात घेतांना, सुरु करतांना होणारे फायदे-तोटे, दुरगामी परिणाम यांचा विचार करुन सखोल अभ्यास करुन कामास सुरुवात करण्याची खास हातोटी राजवर्धनदादा यांच्याकडे आहे. याचा अनुभव इंदापूर तालुक्यातील जनतेला आला आहे कोणतेही काम असुद्यात ते तत्परतेने व अत्मियतेने करत राजवर्धन पाटील यांनी युवकांच्या व ग्रामविकासाच्या विविध प्रश्नांवर समस्येवर आवाज उठवुन न्याय दिला आहे.युवकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणार्‍या,विकासासाठी राजकारण, समाजासाठी समाजकारण,अन्यायाला आळा घालणार्‍या या युवा नेतृत्वाने युवकांच्या हृदयाच्या सिंहासनावर अढळ स्थान निर्माण केले आहे. या असामान्य नेतृत्वाचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या कार्याचा हार्दिक शुभेच्छा दादा आपले कार्य सुखाचे समृध्दिचे भरभराटीचे आरोग्यदायी जावो आणि उदंड अयुष्य मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना.


            शब्दांकन: दत्तात्रय सावंत सर
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here