इंदापूर: लहान मुलांना जपताना पालक नेहमीच विशेष काळजी घेत असतात परंतु काळजी घेऊन सुद्धा कधी काय होईल ते सांगता येत नाही असेच एक उदाहरण इंदापूर तालुक्यातील पिंपरी खुर्द या गावातील कडाळे कुटुंबाने आज मंगळवार दि.6 सप्टेंबर रोजी अनुभवला .आज सकाळी ठीक 7.30 वाजता पिंपरी खुर्द येथील कडाळे कुटुंबातील 2 वर्षाचा चिमूरडा राजरत्न उर्फ अभि यास त्याचे पालक डाळिंब चालत असताना त्या डाळिंबाचा बियामुळे ठसका लागून एक बी उजव्या फुफुसात शिरल्याने फुफ्फुस पूर्ण बंद झाले. त्यानंतर त्या पालकांनी तातडीने लहान मुलांचे सुप्रसिद्ध डॉ एल एस कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये तातडीने घेऊन आले.ज्यावेळी या बाळाला हॉस्पिटलमध्ये आणले होते त्यावेळी त्याची प्रकृती खूप गंभीर व चिंताजनक होती त्याच्या हृदयाचे ठोके लागत नसल्याने पालकांसह डॉक्टरांची ही चिंता वाढत होती.राजरत्न हा चिमुरडा आता बेशुद्ध अवस्थेत होता त्याला श्वास घेता येत नसल्याने त्याच्यावर अति तातडीचे उपचार करून कृत्रिम श्वास चालू करणे खूप महत्त्वाचे होते.त्यामुळे डॉक्टर एल एस कदम यांनी अति तातडीने भूलतज्ञ डॉ शेंडे व डॉ सुहास शेळके यांना बोलवून अति धोका पत्करून ब्रांकोस्कोपी केली. तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाळाला वाचवण्यात या सर्व टीमला यश मिळाले. याच बाबतीत बालरोग तज्ञ डॉ.कदम यांनी सर्वांना एक आवाहन केले आहे की, पाच वर्षाच्या आतील बाळाजवळ आख्खे शेंगदाणे,फुटाणे,डाळिंब हे खायला देऊ नये जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत.बाळाला मिळालेल्या या जीवनदानामुळे कडाळे कुटुंबांनी बालरोग तज्ञ डॉ.कदम, बोंगाणे ,शेळके, शेंडे या सर्व डॉक्टरांचे आभारही मानले.