निमगाव केतकी: बहुचर्चित संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग 965 जी आता निमगाव केतकी गावाबाहेरून घेण्याकरिता प्रशासनावर दबाव वाढल्याचे दिसून आले.
आज निमगाव मधील व्यापाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलनाचे अस्त्र वापरले असल्याचे दिसून आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि,निमगाव मधील या व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पुर्वी शासनाने राजपत्रात जो बायपास मंजुर केला आहे त्या पत्रानुसार बायपास झाला पाहिजे.तुम्ही जर गावातून रोड आणला तर अनेक जणांचे कुटुंब उध्वस्त होतील, अनेक जण उपासमारीची वेळ येईल जर व्यापारच नाही राहिला सर्व व्यापाऱ्याच्या घरातील कुटुंब कसा जगेल? यासाठी शासनाने जो बायपास मंजूर केला आहे त्या मार्गावरूनच रोड जावा यासाठी निमगाव केतकी येथील व्यापारी वर्ग आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. विशेष म्हणजे आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता व्यापारी वर्गाने गाव बंद ठेवून आंदोलन करणे चालू केले आहे.
दरम्यान,निमगावमधीलच काही व्यापाऱ्यांनी बायपास गावातूनच जावा अशी मागणीही यापूर्वी केली असल्याने प्रशासनाची मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी तारांबळ होणार हे मात्र नक्की.
आज चालू असलेल्या आंदोलनात माजी सभापती दत्तात्रय शेंडे, माजी सरपंच दशरथ तात्या डोंगरे, मच्छिंद्र आप्पा चांदणे,बापू काका घाडगे ,भरत दादा मोरे, कांतीलाल भोंग, संजय राऊत, सचिन मुलाणी, दादा भिसे,सरपंच प्रवीण डोंगरे उपसरपंच सचिन दादा चांदणे, विजय महाजन, भारत गांधी, अजित भोंग, संदीप पवार, अजित ननवरे , प्रशांत भिसे, निमगाव केतकी मधील शेकडो व्यापारी वर्ग उपस्थित होते.