राजकीय मैदानासह आमदार दत्तात्रय भरणे यांनी खेळाचेही मैदान गाजवत जिंकली युवकांची मने. वाचा सविस्तर.  

इंदापूर: नेहमीच आपल्या हटके स्वभावामुळे आमदार भरणे मामा चर्चेचे विषय बनलेले आहेत. याच आपल्या आगळ्यावेगळ्या स्वभावामुळे ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या ठिकाणच्या युवकांपासून ते वृद्धांपर्यंत मने जिंकायला ते कोठेच कमी पडत नहीत याचा आजही आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रत्यय आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की,इंदापूर तालुक्यात एल .जी .बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पळसदेव येथे तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा सन 2022 – 23 अंतर्गत 14 ते 19 वर्ष वयोगटातील मुले व मुली यांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम आमदार भरणे मामा यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या खासदार फंडातून उभारलेल्या नवीन इमारतीचे लोकार्पण आमदार भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी उद्घाटन झाल्यानंतर कबड्डी स्पर्धेमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी सहभागी होऊन कबड्डीचा खेळ खेळला. राजकारणात जशी दमदार एन्ट्री झाली त्याच पद्धतीने कबड्डीतही खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे. म्हणून मामांनी एन्ट्री मारली. व या एन्ट्री मध्ये दोन गडी बाद ही केले. यावेळी उपस्थित युवकांनीही मामांच्या या एंट्रीला उस्फुर्त दाद दिली.भरणे मामांच्या वेगळेपणाचे आणखी एक उदाहरण पाहायला मिळाले ते म्हणजे ज्यावेळी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन झाले त्यावेळेस नारळ फोडण्यासाठी स्वतः किंवा नेतेमंडळींकडून न फोडता शालेय विद्यार्थिनीकडून नारळ फोडून आणखी एक वेगळेपण उपस्थितीत मंडळींना दाखवून दिले.आमदार भरणे हे स्वतः राजकीय मैदानात रोजच खेळत असतात. आज त्यांनी मुलांबरोबर कबड्डी खेळण्याचा आनंदही घेतला.यावेळी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत नाना बनसोडे ,उपाध्यक्ष डॉ. शितल कुमार शहा ,कार्याध्यक्ष नंदाताई बनसोडे, पंचायत समिती सदस्य प्रदीप काळे, पळसदेवचे सरपंच इंद्रायणी मोरे, उपसरपंच कैलास भोसले तसेच आजी-माजी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.एकंदरीतच आमदार भरणे तालुक्यात ज्या-ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जातात त्या-त्या ठिकाणी असे काही ते काम करतात ज्यातून उपस्थितांची मने ते जिंकल्याशिवाय रहात नाहीत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here