इंदापुर: आपल्या परखड मताने सर्वांचे लक्ष वेधून घेणारे विभीषण लोखंडे यांनी शेतीपंपाची विजतोडणी संदर्भात आपले पुन्हा एकदा परखड मत व्यक्त करून सर्वांचे लक्ष वेधले आहे आज ‘जनता एक्सप्रेस मराठी न्यूज’ बोलताना बिभीशन लोखंडे म्हणाले की,इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते विषय होता शेतकऱ्यांच्या हिताचा.2014 पूर्वी भारतीय जनता पार्टीने आमचा पक्ष राज्यात सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांची वीज बिल माफ करू करू अशी घोषणा केली होती आणि त्यांनी ते पाच शेतकऱ्याकडून वीज बिल वसुली न करता पाच वर्षे सरकार चालवले नंतर 2019 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमच्या पक्षाची सत्ता आल्यास संपूर्ण सातबारा कोरा करू शेतकऱ्यांची वीज बिल माफ करू असं जाहीर सभेतून आश्वासने दिली असताना देखील इंदापूर सह इतर ठिकाणी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली त्याच विषयाचा दोन्ही पक्ष राजकारण करत असून दोन्ही पक्षांना विनंती आहे की जर तुम्हाला शेतकऱ्याचा लईच पुळका येत असेल आम्ही शेतकऱ्यांची लेकरे आहोत असं मनापासून वाटत असेल तर शेतकरी हा केंद्रबिंदू मानून एकत्र येऊन विधानसभेमध्ये इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र देखील मोफत वीज पुरवठा करण्यासंदर्भात ठराव पारित करावा मग सर्व जनतेला कळेल ,विधानसभेमध्ये शेतकऱ्याची लेकरे आमदार म्हणून आहेत जसे आमदारांना पगारवाढ चार चाकी गाडी घेण्यासाठी सरकार बिनव्याजी 30 लाख रुपये कर्ज देण्याचा ठराव एकमताने मंजूर होतो मग शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ठराव का मंजूर होऊ नये?? पुढे ते म्हणाले की,राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर करायचा बंद करा शेतकऱ्यांना सबसिडी अनुदान असं काही मागायची गरज नाही फक्त शेतीला मोफत आवश्यक तेवढी वीज द्यावी व शेतकऱ्याने रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या वस्तूला हमीभाव व शेतीसाठी लागणारा आवश्यक ते कर्ज तात्काळ व वेळेवर मिळावं एवढीच माफक अपेक्षा आहे हे जर शेतकऱ्याला नाही मिळालं तर शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारल्यानंतर काय होतं हे दिल्लीतील आंदोलनाने सिद्ध करून दाखवलेला आहे त्यामुळे राज्यातील नेत्यांनी देखील शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये अन्यथा एक दिवस शेतकरी चाबूक हातात घेऊन बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा मात्र कोणाचीही गय केली जाणार नाही हेही लक्षात ठेवा. सध्या इंदापूरच्या नेत्यांमध्ये यासंदर्भातलं श्रेय घेण्यावरून चढाओढ लागलेले आहे ती योग्य नाही असं बहुजन परिषदेचं मत आहे.