👉 नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयी साठी स्वतः दोन लाख देत केली मदत
निमगाव केतकी: आज-काल नुसती आश्वासने देत मतदारांना भुलथापा मारण्याचे प्रकार अनेक वेळा पाहिला मिळाले आहेत परंतु स्वतःच्या खिशातून पैसे खर्चून गावातील बांधवांचा वाद मिटवण्याचा प्रकार अजूनही आपण ऐकला नव्हता परंतु स्वतःच्या खिशातून तब्बल 2 लाख रुपये देत गावात तीन वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढण्याचे सत्कार्य कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे नूतन संचालक तुषार जाधव यांनी केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की निमगाव केतकी शेंडेमळा हा रस्ता मागील तीन वर्षापासून अंतर्गत वाद विवादाच्या कारणास्तव बंद होता.इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुषार जाधव यांनी मध्यस्थी करत रोख स्वरूपात दोन लाख रुपये देत मदत केली आणि या रस्ताचा कायमचा प्रश्न मिटला व हा रस्ता खुला केला.रस्ता खुला करण्यासाठी तुषार जाधव यांनी आर्थिक स्वरूपात मदत केल्यामुळे निमगाव केतकी ग्रामपंचायत सदस्य दादाराम शेंडे, ब्रह्मदेव शेंडे, बाळू शेंडे, डॉ. दीपक शेंडे, संतोष गदादे, दत्तू शेंडे, बैजू शेंडे, मोहन शेंडे, अजिनाथ शेंडे आदींनी शाल श्रीफळ व फेटा बांधून त्यांचा सत्कार केला.निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील शेंडेमळा, जानईमळा, वरचा शेंडेमळा, तसेच विविध छोट्या-मोठ्या वाडी वस्तीवर जाणारा रस्ता मागील तीन वर्षापासून स्थानिक अंतर्गत वादामुळे बंद होता. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी, शेतकरी, तसेच मालवाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. अनेकांनी रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न केला;मात्र तो निष्फळ ठरत होता. परंतु इंदापूर बाजार समितीचे संचालक तुषार जाधव यांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर रस्ता खुला करून ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत दोन लाख रुपये रोख स्वरूपात देत बंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. या रस्त्यासाठी शेंडे मळा येथील जगन्नाथ शेंडे, बापू शेंडे, गोरख शेंडे, तुळशीदास शेंडे, परशुराम शेंडे नवनाथ आदलिंग या शेतकऱ्यांनी या रस्त्यासाठी जमिनीतून जागा दिली. आता हा रस्ता खुला झाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे व तुषार जाधव यांनीही भूलथापा न देता प्रत्यक्षात गावासाठी कशी मदत करावी याचे एक उत्तम उदाहरण दिले आहे.
Home Uncategorized युवा नेते तुषार जाधव यांनी गावातील रस्त्याचा वाद मिटण्यासाठी स्वतःच्या खिशातून ...