राजकारणातील नैतिकता जोपासत सर्वसामान्य जनतेच्या हृदयसिंहासनावर आरूढ झालेलं नेतृत्व म्हणजे युवारत्न अंकिता पाटील-ठाकरे ( ताईसाहेब)! वारसाने मिळालेल्या सगळ्याच गोष्टी प्रत्येक मुलांना जपून ठेवता येतील असं आजिबात नाही परंतु नामदार हर्षवर्धन पाटील साहेबांकडून मिळालेले गुण, वारसा जोपासत वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वगुणांचा अफाट संचय अंगी बाळगून स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण करून संपूर्ण महाराष्ट्रभर ताईंनी आपला प्रभाव पाडलेला आहे.राजकारण करताना आपल्या हातून समाजकारण घडावं या उद्देशाने सतत समाजहिताच्या गोष्टी करण्यासच त्यांनी प्राधान्यक्रम दिल्याचे आजवर दिसून आले आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात तसं पाहिलं तर अनेक जेष्ठ मंत्री आहेत, होतेही.. परंतु एक तरूण महिला जिल्हा परिषद सदस्य असूनही त्यांच्यापेक्षा कणभर उजवं काम ताईसाहेबांकडून होत आहे. पारदर्शकपणे राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण केल्याने त्यांच्या नेतृत्वाला एक वेगळी झळाळी मिळाली आहे.अंकिता हर्षवर्धन पाटील या बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत.महाराष्ट्र सरकारमध्ये वीस वर्षांहून जास्त काळ मंत्री राहिलेले माजी मंत्री हर्षवर्धन शहाजीराव पाटील यांच्या त्या कन्या आहेत तर निहाल ठाकरे यांच्या पत्नी. एस. बी. पाटील शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षा, ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या (इस्मा) कायदेशीर उपसमितीच्या सहअध्यक्षा व इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन लि.च्या संचालिका आहेत.अंकिताताई या उच्चविद्याविभूषित तर आहेतच, तसेच हर्षवर्धन पाटील यांच्या संस्कारक्षम कुटुंबात वाढलेल्या अंकिताताई सर्वसामान्य व्यक्तींसाठी सर्व क्षेत्रांत अगदी मनापासून कार्य करीत आहेत. ग्रामीण भागातील युवती तसेच महिला आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तालुक्यातील विशेषत: ग्रामीण भागातील युवतींना आपले स्वतःचे सामर्थ्य सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी एकत्रित आणण्याच्या दृष्टीने त्यांचे व्यक्तिमत्त्व इंदापूर तालुक्याला एक अभिमानस्पद प्रेरणादायी असल्याचे दिसून येते.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत ग्रामीण भागात एक सक्षम युवारत्न म्हणून त्या सदैव प्रयत्नशील आहेत.कोरोना पार्श्वभूमी, अतिवृष्टी, लॉकडाऊनकाळातील शिक्षणप्रक्रिया, महिला व युवतीसंदर्भातील कार्य इस्माच्या माध्यमातून साखर कारखान्यासंदर्भातील केलेले काम तसेच सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी अंकिताताई यांनी कार्य केलेले आहे.अंकिताताई यांनी आपले शिक्षण पुणे तसेच लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये घेतले आहे. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य पैलू पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे शिक्षण मुला-मुलींना दिले पाहिजे, यासाठी त्यांचा सततचा प्रयत्न असतो. एस. बी. पाटील शैक्षणिक संकुलाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.अगदी लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचण्यासंदर्भातील त्यांचे कार्य मोठे आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील शिक्षणप्रक्रिया परिपूर्ण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षक, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, तसेच विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचे संकट गडद झाले होते अशावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. आपल्या बावडा-लाखेवाडी गटातील नागरिकांमध्ये कोरोनासंदर्भामध्ये जनजागृती करून कोरोनाला अटकाव होण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच, या काळात उपचारासाठी डॉक्टरांची संख्या अपुरी होती, ती उपलब्ध करून देण्याचे त्यांनी काम केले. तसेच, परिचारिकांच्या वेतनाचा प्रश्न सोडविला.कोविड सेंटरला भेट देऊन तिथे अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. पी. पी. ई. किट, बेड तसेच ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले. कोरोना सर्वेक्षणामध्ये स्वतः सहभागी होऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. अतिवृष्टीमुळे तालुक्यामध्ये महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला होता. अशा परिस्थितीमध्ये आपले कर्तव्य बजावण्यासाठी, लोकांना धीर देण्यासाठी अंकिताताई यांनी अनेक गावांचा दौरा केला.लॉकडाऊन’ च्या काळात परदेशी शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासंदर्भात अंकिताताई यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. युवती, महिलांवरील अन्याय तसेच त्यांच्या न्यायहक्कासाठी त्या सदैव प्रयत्नशील असतात. सर्व समाजातील मुला- मुलींना आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सरकारदरबारी निवेदन,तसेच आंदोलनांमध्ये सहभागी होऊन प्रयत्न केले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये सर्वोच्च मताने विजय संपादन केला आहे; तसेच आपल्या कार्य कर्तृत्वाचा एक चांगला आदर्श अंकिताताई हर्षवर्धन पाटील ठाकरे यांनी निर्माण केला असून, ग्रामीण भागामध्ये कार्य कर्तृत्वाने त्या युवारत्न म्हणून ओळखल्या जात आहेत.‘इस्मा’च्या सहकार्याने त्या साखरकारखानदारीतील शेतकरी वर्गाविषयी न्यायहक्काने प्रश्न खूप मोठे सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या परम ध्येयाने राष्ट्रनिर्माणासाठी अविरत कार्यकरणाऱ्या,राज्याच्या राजकीय पटलावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख उंचावणाऱ्या स्वाभिमानी आणि कणखर नेतृत्व म्हणजेच युवारत्न अंकिताताई यांचा आज वाढदिवस कायम जनसेवेचे व्रत अंगिकारलेल्या रणरागिणीस या शब्द रुपी शुभेच्छा
ताईसाहेब..आज आपला वाढदिवस..! ज्या डोळ्यांनी हे सुंदर विश्व पाहतोय.. त्याच डोळ्यांनी आपल्या हातून अशीच समाजहिताची, समाजउद्धाराची कामे होवून हे राज्य समृद्ध होताना दिसू देत हीच प्रार्थना.. आणि त्यासाठी अंतःकरणपूर्वक सदिच्छा! शेवटी इतकंच, वाढदिवस हे फक्त निमित्त, प्रति दिन छान व्हावा.. यश-कीर्तीच्या सुगंधाने, सारा आसमंत दरवळावा..! – श्रीयश नलवडे: संपादक जनता एक्सप्रेस मराठी न्यूज