मोठी बातमी : पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ, संपूर्ण स्टेशन केले सिल

पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृश वस्तू सापडली असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. यामुळे संपुर्ण रेल्वे स्थानकाचा परिसर सील करण्यात आला असून बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.अज्ञात व्यक्तीने ही स्फोटके ठेवली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान पोलिसांनी एक बॉम्ब निकामी केला असून दुसरा निकामी करण्याचे काम सुरु आहे.पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब सापडल्यानंतर लागलीच याठिकाणी बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉड पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. पुणे रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले आहे. तसेच या परिसरात कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. काही काळासाठी रेल्वे वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे.पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वेही थांबण्यात आल्या आहेत. पुणे रेल्वे स्थानकाचा परिसर सील करण्यात आला आहे. दुसरीकडे पुण्यात बॉम्ब सापडल्यामुळे गुप्तचर यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. बॉम्ब शोधक पथकाने बॉम्ब निकामी करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. दरम्यान अजून कोणत्याही संघटनेने या घटनेची जबाबदारी घेतली नाही.यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता रेल्वे स्थानकात दाखल झाले असून त्यांनी परिसराची पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, “आज सकाळी साडेदहा वाजता रेल्वे पोलीस स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित वस्तू जिलेटीन नसल्याचं समोर आलं आहे. पुढील तपास करत आहोत. पॅनिक होण्याची गरज नाही.”

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here