“मोटर सायकलवरून लोकांना सहज भेटता येतं, त्यामुळे आमदार झालो तरी चारचाकीत फिरणार नाही”- आमदार रविंद्र धंगेकर

तब्बल २८ वर्षांनंतर काँग्रेसनं कसब्यात भाजपचा पराभव केला असून त्यात रविंद्र धंगेकर यांचा सिंहाचा वाटा असल्याच्या चर्चा आहे.कसब्यातील राजकीय हायहोल्टेज पोटनिवडणुकीत भाजपला धूळ चारत विजय खेचून आणणारे काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे. रवींद्र धंगेकर यांच्या अंगी असलेला साधेपणा व मदत करण्याची प्रवृत्ती यामुळे ते जनमानसात पोहोचले आहेत. रविंद्र धंगेकर कधीही चार चाकीमध्ये बसत नाहीत यामागचं रहस्य विचारलं असता ते म्हणाले की, “फोर व्हिलरमध्ये जायला वेळ लागतो. टू व्हिलरवर लवकर पोहचतो आणि लोकांची काम होतात असे धंगेकर म्हणाले.तसेच मी आमदार झालो असलो तरी बाईक सोडणार नाही. टू व्हिलरवर लोकांना सहज भेटता येतं आणि लोक पण हक्काने भेटून कामं सांगतात.” असं रविंद्र धंगेकर यांनी सांगितलं. रविंद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी धंगेकरांची ओळख राहिली आहे. मनसेमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केलं. इथंच त्यांची राजकीय कारकीर्द फुलली. रविंद्र धंगेकर हे कसब्यात मागील २५ वर्षांपासून नगरसेवक होते. त्यामुळे जनतेचा कायम त्यांना पाठिंबा राहिला आहे. त्यासोबतच ते सामान्यांचे नेते आहेत. रात्रीबेरात्री नागरिकांच्या कामाला धावून जातात, अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे सामन्यांपासून उच्चभ्रू लोकापर्यंत ते सगळ्यांचे लाडके नेते आहेत. एकंदरीतच त्यांचा साधेपणा व मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे ते आता कसब्यातील नागरिकांच्या मनात बसले आहेत एवढे मात्र नक्की..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here