सुवर्णयुग पतसंस्थेच्या परंपरेचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेनी केले कौतुक…
निमगांव केतकी : (प्रतिनिधी)
इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी माझ्यावर नेहमीच विश्वास दाखवला असून त्यांच्यासाठी निधीची कमतरता भासु देनार नसून तालुक्यातील गावागावांत कब्रस्तान तसेच दर्गाहच्या सरक्षंक भिंतीसाठी व मस्जिदीच्या शादीखाना आदी विकास कामांच्या सुशोभीकरणासाठी निधी कधीही कमी पडु देणार नसल्याचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज आपल्या भाषाणात स्पष्ट केले.
इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी व महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या सुवर्णयुग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने सालाबादप्रमाणे याही वर्षी मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यानिमित्त निमगांव केतकी येथे उपवासधारंकाना गुरुवारी २८ एप्रिलला रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते त्यावेळी राज्यमंत्री भरणे बोलत होते .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात निमगांव केतकीचे सरपंच व पतसंस्थेचे संचालक प्रवीण डोंगरे म्हणाले की ,आमच्या पतसंस्थेच्या व दशरथतात्या डोंगरे मित्र परिवाराच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवित असून जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील लाखो भाविक भक्तांना अन्नदान तसेच दिपावलीत गरिब गरजु महिलांना साडी फराळाचे पदार्थ व रमजान महिन्यात इंदापूर तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजबांधवांना रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन आम्ही करत असतो हीच समाजजोडणीची परंपरा यापुढेही अशीच कायम चालु ठेवनार असल्याचे डोंगरे यांनी यावेळी सांगितले .राज्यमंत्री भरणे पुढे म्हणाले की इंदापूर तालुक्यात बऱ्याच गावातील मुस्लिम समाजाची विकासकामे झालेली नव्हती ती मी पुर्णत्वास नेहली आहेत.
सुवर्णयुग सहकारी पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद अत्यंत सामजहित जोपासणारे असून त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पदक स्तुत्य असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णयुग सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दशरथ तात्या डोंगरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ॲड शुभम निंबाळकर, माजी सभापती दत्तात्रेय शेंडे, ॲड .लक्ष्मणराव शिंगाडे,बापूराव शेडे, मनोहर मिसाळ, ॲड सतीश वाघ ,अतुल मिसाळ, सिंकदर मुलाणी ,भारत मोरे, अस्लम मुलाणी ,शब्बीर शेख ,सचिन मुलाणी , रेहना मुलानी कांतीलाल भोंग,इमाम मुलाणी ,मक्का मस्जिदचे पेशइमाम मौलाना वारिस जमाली, दर्गाह मस्जिदचे पेशइमाम मौलाना महेमूद शेख कपिल हेगडे, सचिन बनकर , माजी उपसरपंच सचिन चांदणे ,ग्रामपंचायत सदस्य अमोल हेगडे, अजित मिसाळ, संतोष जगताप, माणिक भोंग ,सागर मिसाळ ,आशपाक पठाण ,कोंडीबा भोंग, शंकर भोसले, अहमद मुलाणी ,जमिर पठाण ,आमिन मुल्ला, सुरज शेख,शेख फरिद सय्यद, प्राध्यापक सत्तार मुलाणी, सोहेल पठाण, समिर मुलाणी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. इफ्तार पार्टी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष गदादे यांनी केले.आभार मच्छिंद्र चांदणे यांनी मानले.