मुरुडच्या सामाजिक व राजकीय दुनियेतील सदाबहार व्यक्तिमत्व ज्येष्ठ नागरिक गुलाब भाई बागवान यांचे दुःखद निधन..मुरुड पंचक्रोशीत शोककळा.

मुरुड गावातील सामाजिक व राजकीय दुनियेतील व्यक्तिमत्व मनमिळाऊ माणूस गुलाब भाई बागवान यांचे अपघाती निधन झाले असून मुरुड गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पाश्चात तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे .सोलापूर या ठिकाणी आपल्या मुलीला भेटण्यासाठी ते आले होते फेरफटका मारण्यासाठी घराच्या बाहेर पडले असता पाठीमागून येणाऱ्या टेम्पो ने त्यांना जोरदार धडक दिल्याने ते जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ सिविल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले .डॉक्टरांनी देखील शर्तीचे प्रयत्न केले परंतु डॉक्टरांचेही प्रयत्न अयशस्वी झाले आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ते 62 वर्षाचे होते .त्यांच्या या अचानकपणे निधनाने मुरुड गावात आणि संपूर्ण लातूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.अतिशय शांत संयमी मनमिळावू व्यक्तिमत्व गुलाब भाई बागवान अचानक सोडून गेल्याने मुरुड व पंचक्रोशीत दुःख व्यक्त केले जात आहे. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून गुलाब भाईना भावपूर्ण श्रद्धांजली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here