मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापुरात होणार मोफत भव्य नेत्र तपासणी, मोतीबिंदू ऑपरेशन, चष्मे वाटप शिबिर

इंदापूर तालुक्यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटात नुकतेच दाखल झालेल्या महारुद्र पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवेश केल्यानंतर इंदापूर तालुक्यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद वाढलेली पाहायला मिळाली. याच शिवसेनेच्या मार्फत आता सामाजिक क्षेत्रातही योगदान चालू केलेले दिसून येत आहे.कारण महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसाच्या निमित्त रविवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते विजय बापू शिवतारे यांच्या सूचनेनुसार व जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे व महारुद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे शिवसेना बाळासाहेब ठाकरेच्या जिल्हा संघटिका सीमा कल्याणकर यांनी सांगितले.नुकतेच या शिबिराबद्दलच्या योजना बद्दलचे निवेदन डॉक्टर सुहास शेळके यांना देण्यात आले. या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप करण्यात येणार असून ज्या रुग्णांना मोतीबिंदू झाला आहे अशा रुग्णांसाठी शस्त्रक्रिया करण्याचेही नियोजन या शिबिरा मार्फत होणार आहे. त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांच्या व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत माहिती जिल्हा संघटिका सीमा कल्याणकर यांनी दिली.
इंदापूर तालुक्यात खूप दिवसानंतर नेत्र तपासणी चष्मे वाटप व मोतीबिंदू ऑपरेशनचे शिबिर आयोजित केले असल्यामुळे इंदापूर तालुक्यातील लोकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या शिबिरात सर्वांनी सहभागी व्हावे असेही सीमा कल्याणकर यांनी सांगितले. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्फत रविवार दि.12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिबिराविषयीची व मोफत शस्त्रक्रियांविषयी अधिक माहिती घेण्यासाठी गरजू लोकांनी शिवसेनेचे पोलीस स्टेशन समोरील असणाऱ्या गाळा नंबर ४ या  कार्यालयात  संपर्क साधावा: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक: 📱  77966 88214


Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here