इंदापूर: वीरश्री मालोजीराजे भोसले प्रतिष्ठान च्या वतीने आज इंदापूर तहसीलदार यांना एक निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात असं म्हणला आहे की ,ज्या महाराष्ट्रात गोमातेची हत्या करणाऱ्या कसायाचे हात छाटण्याच्या इतिहास आहे, त्याच महाराष्ट्रात राज्यकर्त्याच्या नाकर्तेपणामुळे कसाई मोकाट सुटलेले आहेत हेच महाराष्ट्राचे दुदैर्व आहे.
आशिष बारीक यांना काल रात्री मिळालेल्या माहितीनुसार चुनाभट्टी परिसरात 40/ते 50 गाई कापून त्यांचे गोमांस टेम्पोत भरून सकाळी निघणार होते याची माहिती पोलिसांना देऊन सीनिअर पीआय व त्यांची पूर्ण पोलीस टीम घेऊन ते निघाले होते त्याच वेळी कसायानी त्यांची पाळत ठेवून रस्त्यामध्ये त्यांना अडविले आणि पोलिस उपस्थित असताना देखील त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या निवेदनात आशीष बारीक यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तहसीलदार यांना देण्यात आली.कसाई कायदा दावणीला बांधून आपल्याला हवे असलेले गुन्हे करण्यास मुक्त झाले आहेत. या हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी वीरश्री मालोजीराजे भोसले प्रतिष्ठान यांच्याकडून मा. तहसीलदार श्रीकांत पाटील साहेबांना निवेदन देण्यात आले. प्रेमकुमार जगताप,शेखर गुजर,भरत आसबे, अवधूत बाचल,पृथ्वीराज सुर्वे, निळकंठ काशीद, प्रथमेश पिसे, ओंकार हिंगमिरे व इतर काही गोप्रेमी उपस्थित होते.