मीराबाई चानू यांच्या यशाने नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल- राजवर्धन पाटील.

मिराबाई सानू यांचा सर्व देशवासीयांना गर्व आहे- राजवर्धन पाटील
इंदापूर:भारतीय वेटलिफ्टर्सची कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील जबरदस्त कामगिरी कायम असून आता दिग्गज वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. या तिच्या मिळवलेल्या यशाबद्दल नीरा भीमा सहकारी कारखान्याचे संचालक तथा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते राजवर्धन पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.शुभेच्छा देताना ते म्हणाले की,”मीराबाई चानू यांनी केलेल्या कामगिरीमुळे नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल त्यांनी या केलेल्या कामगिरीचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.अशा शुभेच्छा राजवर्धन पाटील यांनी दिल्या.पुढे राजवर्धन पाटील म्हणाले की,”कॉमनवेल्थमध्ये आज एकाच दिवसातील भारताचं हे तिसरं पदक आहे. मीराबाई यांनी 49 किलो वजनी गटात पदक मिळवलं आहे.एकूण 201 किलोग्राम(113+88) वजन उचलत मीराबाई यांनी रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.
पुढे ते म्हणाले की,टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या मीराबाईकडून कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती.जी त्यांनी पूर्ण करत भारतासह स्वत:च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे सर्व भारतीयांना त्यांचा अभिमान आहे.”अशा शब्दात राजवर्धन पाटील यांनी मिराबाई सानू यांचे कौतुक केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here