‘मिशन बारामती’चे पडसाद आता विधानसभेत.अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा ‘करेक्ट कार्यक्रमा’वर कलगीतुरा.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच कित्येक महिने भारतीय जनता पक्षाने ‘मिशन बारामती’ अभियान राबवून बारामती ताब्यात घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याकरता गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार राहुल कुल यांना राजकीय ताकद दिली जात आहे. गेल्या दोन महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय जलशक्ती व अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यात इंदापुरात स्थानिक प्रश्नांचा आढावा घेतला. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा सध्या प्रचाराच्या रणनीतीतील केंद्रबिंदू ठरला आहे.केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन इंदापुरात येऊन जाताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, विधान सभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार आदींनी इंदापुरात हजेरी लावली होती.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीचा दौरा केला.बारामती मध्ये त्यांनी अनेक पक्षप्रवेशही घेतले त्यामध्ये युवकांचे जोरदार संघटन असणारे शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक अण्णा काटे यांच्या समवेत हजारो युवकांनी भाजपात प्रवेश केला.तेव्हा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचं आव्हान बावनकुळेंनी राष्ट्रवादीला दिलं होतं. आणि याच घडामोडीचे पडसाद नागपूरमधील विधिमंडळ अधिवेशनात उमटले.
चंद्रशेखर बावनकुळेंच्या आव्हानाचा विरोधी पक्षनेते अजित पवारांकडून विधानसभेत समाचार घेण्यात आला. “राज्यात शिंदे-भाजपा सरकार स्थापन झाल्यावर एक नेते बारामतीत आले. तसेच, बारामतीत घड्याळ बंद करत ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार असल्याच्या वल्गना करु लागले. आता आमचं तिथे काम आहे, खरचं ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार आहे का? जर मनात घेतलं तर, त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करेन. महाराष्ट्राला माहिती मी आव्हान दिलं तर कोणाचंही ऐकत नाही,” असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ते नागपूरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “बारामतीत येऊन कोणी आव्हान देणं अजित पवारांना आवडत नाही. राजकारणात कोणी आढळपद घेऊन आलं नाही. इंदिरा गांधी यांच्यासारख्या अतिशय शक्तीशाली नेत्याला देखील निवडणुकीत पराभवाला सामोर जावं लागलं होतं,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
“२०१४ साली सुप्रिया सुळे थोड्या मतांनी निवडून आल्या आहेत. बारामती मतदारसंघावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं लक्ष आहे. ‘मिशन बारामती’ प्रमाणे ‘मिशन महाराष्ट्र’ आहे. ‘मिशन महाराष्ट्र’ अंतर्गत बानवकुळे बारामतीत गेल्याने बावनकुळेंना अजित पवारांना फार राग आलेला दिसत आहे. अजित पवारांना समजून सांगू, की महाराष्ट्रात सगळीकडे आम्ही जात आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.बारामती लोकसभा मतदारसंघात आता भाजपाची ताकद वाढली आहे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल,गणेश भेगडे,जालिंदर कामठे,भीमराव तापकीर,शरद ढमाले,वासुदेव काळे,बाळासाहेब गावडे,पांडुरंग कचरे यासारखे दिग्गज नेते आपली ताकत बीजेपीला लावणार आहेत तर शरद पवार अजितदादा पवार सुप्रियाताई सुळे हे विकासाच्या मुद्द्यावर लढतील त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुक रंगतदार होईल हे नक्की. त्यामुळे कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करेल यासाठी करेक्ट वेळेची वाट पहावी लागेल.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here