जनता एक्सप्रेस मराठी न्यूज दौंड प्रतिनिधी
अजय तोडकर मो.नं.7776027968
यवत : गेल्या दहा दिवसापूर्वी यवत गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच हरित वारी फाऊंडेशनचे सभासद प्रकाश भाऊ वरुडकर यांचं अपघाती निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त हरितवारी फाउंडेशन, शिवशंभु प्रतिष्ठान तसेच त्यांचा सर्व मित्रपरिवार सर्वांनी एक अनोख्या प्रकारची श्रद्धांजली वाहण्याचे ठरवले व सर्व मित्र परिवारला आव्हान केले की आपल्या मित्राला आपण रक्तदान करून एक अनोख्या प्रकारे श्रद्धांजली वाहूया या हाकेला यवत परिसर व पुणे जिल्ह्यातील सर्व मित्र परिवाराने साथ देत काल दशक्रिया विधीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन काळभैरवनाथ मंदिर येथे करण्यात आले होते. याचे उद्घाटन गोरक्षक समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मिलिंद जी एकबोटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी यावेळी यवत गावांमध्ये उड्डाणपूल व्हावा अशी मागणी केली, यावेळी 186 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांना पाच लाखाचा अपघाती विमा देण्यात आला.
भाऊंचा समाजकार्यात मोठा वाटा होता. त्यांनी हरितवारी फाउंडेशन च्या माध्यमातून भुलेश्वर, यवत परिसरामध्ये आत्तापर्यंत भरपूर झाडे लावली तसेच निर्मल वारी च्या माध्यमातून यवत परिसर येथे स्वच्छता मोहिमेत त्यांनी कायमच सहभाग होता. या अशा सामाजिक कार्यकर्त्याच्या जाण्याने त्यांच्या सर्व मित्र परिवाराने हळहळ व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन नितीन हेंद्रे, प्रशांत शिवणकर, मनोज बगाडे, रसिका ताई वरूडकर, संदीप राजगुरू, दीपक महाराज मोटे, सुशांत दिवेकर, चंद्रकांत दोरगे, विनायक दोरगे त्यांनी केले व सर्वांचे आभार सामाजिक कार्यकर्ते सुरज चोरगे यांनी व्यक्त केले.