करमाळा (प्रतिनिधी: आम्रपाली शिंदे): ढोकरी तालुका करमाळा फिरण्यासाठी माहेरून बोलेरो गाडी, खर्चासाठी रोख दोन लाख रुपये ,तसेच घरात वापरासाठी दिवान ,आणि फ्रिज घेऊन ये म्हणून सासरच्या लोकांनी छळ करून तगादा लावल्याची फिर्याद सौ. राजश्री मारकड यांनी पोलिसात दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सौ. राजश्री मारकड यांचा विवाह एक वर्षापूर्वी शरद उत्तम मारकड राहणार कुगाव तालुका करमाळा यांच्याशी झाला होता. लग्नानंतर हे कुटुंब शेलारवाडी (पुणे) येथे राहण्यास गेले .सुरुवातीला दोन महिने त्यांचा संसार सुखात गेला. नंतर मात्र शरद मारकड यास दारूचे व्यसन लागले. पिढीत राजश्री मारकड यांच्या म्हणण्यानुसार तेथून पुढे शरद मारकड यांनी रोज भांडण काढून माहेरून बोलेरो गाडी, दोन लाख रुपये ,फ्रीज आणि दिवान घेऊन येण्यासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली व मारहाण देखील होऊ लागली. सदर प्रकारास सासू नंदा मारकड व सासरे उत्तम मारकड हे देखील पूस देत होते .अशी फिर्याद सौ. राजश्री मार्कड यांनी पोलिसात नोंदवली आहे .पोलीस पुढील तपास करत आहेत.