बारामती (विशेष प्रतिनिधी-संदिप आढाव)
शिवनगर, माळेगाव बुद्रुक येथे महेश पैठणकर यांच्यावर दि.१० जुलै रोजी खुनी हल्ला झाला होता. त्याचे CCTV फुटेज मध्ये आरोपी स्वप्नील देऊळकर हा दिसून आला होता. या सर्व घटनेत माळेगाव बुद्रुकचे माजी उपसरपंच सचिन वसंत तावरे पाटील आणि नितीन वसंत तावरे पाटील यांचा सहभाग असल्याचा संशय होता.स्वप्नीलला अटक झाल्यानंतर सचिन तावरे आणि नितीन तावरे यांनी अटकपूर्व जामीन बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयात मागितला होता.परंतु त्यास तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे , सरकारी वकील अॅड. ज्ञानदेव शिंगाडे तसेच पाटणकर यांच्या वतीने अॅड. सचिन वाघ यांनी विरोध केला होता.आरोपिंना अटक झाले शिवाय त्यांचा नक्की हल्ला करायला लावण्यामागे काय उद्देश होता हे निष्पन्न होणार नाही. मुख्य आरोपीने त्यास चिथावणी दिल्या बद्दल कबुली दिली आहे असे म्हणले जाते. बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश गांधी यांनी नितीन तावरे आणि सचिन तावरे यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे.आता सदर आरोपीना पोलीस प्रशासन अटक करते का? याकडे माळेगावकरांचे लक्ष असेल.