महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे हवामान खात्याचे तज्ञ पंजाबराव डख नंतर माळशिरस तालुक्यातील रमेश जाधव हे हवामानाचा अंदाज एकदम अचूकपणे गेली दोन वर्षांपासून सांगत आहेत. आणि त्यांनी सांगितलेल्या हवामान अंदाजाचा फायदा सोलापूर, सातारा ,सांगली ,तसेच पुणे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतोय . हवामान अभ्यासक रमेश जाधव जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना म्हणाले की, बारामती आणि इंदापूर मधील काही भागात १९ आणि २० तारखेला जोरदार पाऊस होईल, तर काही भागात हलका मध्यम पाऊस होईल ,आणि २२ तारखे नंतर हवामान सूर्यप्रकाशित राहील. आणि नंतर २८ ते २९ तारखेला पुन्हा पावसासाठी हवामान सक्रिय होईल .हवामान तज्ञ रमेश जाधव यांनी सोलापूर व पुणे जिल्ह्यामध्ये बहुसंख्य शेतकऱ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यावर ते दररोज शेतकरी बांधवांना कोण कोणत्या तालुक्यात पाऊस पडेल याचे अपडेट्स देतात .पाऊस किती मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो हे ते त्यांच्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगतात. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. पावसामुळे होणारी नासाडी होण्या अगोदरच अचूक हवामान अंदाज सांगितल्यामुळे शेतकऱ्यांचेही कमी प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. शेतकरी वर्ग ही त्यामुळे रमेश जाधव हे सर्व शेतकरी बांधवांची व माळशिरस तालुक्याची शान आहेत असे बोलत आहेत.⛈️ लिंक वर क्लिक करून पहा- निमगाव केतकी येथील ब्रिटिश कालीन पुलालगत पूरजन्य परिस्थिती.👉 https://youtu.be/xNDpc_PGVbA