काल माळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगल बाळासाहेब व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदी सारिका बाळासाहेब मोरे यांची एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माळवाडी ग्रामपंचायत ने एक नवीन संकल्पना राबवत प्रत्येक सहा महिन्याला निवडून आलेल्या सदस्याला गावची सेवा करता यावी यासाठी उपसरपंच पदाची संधी दिली जाते. महाराष्ट्रात असे उदाहरण क्वचितच ऐकायला मिळते परंतु सर्वांना समान मिळावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे एवढेच नव्हे तर विरोधातून एकमेव निवडून आलेल्या सदस्यालाही उपसरपंच पदाची आम्ही जबाबदारी देणार आहोत अशीही माहिती सरपंच सौ मंगल बाळासाहेब व्यवहारे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना दिली. यातूनच महाराष्ट्रात ग्रामपंचायत स्तरावर एक नवीन आदर्श या माळवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आता समोर आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडणारे बाळासाहेब व्यवहारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दीपक रायकर, प्रसिद्ध बागायतदार माधवजी मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय रायकर, इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब मोरे,सचिन मोरे, वीरेंद्र मोरे, रंगनाथ म्हेत्रे,दत्तात्रेय जगताप,राष्ट्रवादी विद्यार्थी युवकचे तालुकाध्यक्ष सागर व्यवहारे, अतुल शिंदे, गोकुळ व्यवहारे, मदन व्यवहारे, अशोक जाधव ,सतीश मोरे , महादेव व्यवहारे,विकास जाधव, शिवराज ढावरे, दादा गुंडेकर, नागेश व्यवहारे इत्यादी प्रमुख ग्रामस्थ तथा सर्वच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गावातील असलेल्या सलोखेच्या वातावरणामुळे उपसरपंच पदाची निवड बिनविरोध झाली असेच एकंदरीत चित्र या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. या निवडीबद्दल मार्केट कमिटीचे संचालक मधुकर मामा भरणे यांनी अभिनंदन केले.
Home Uncategorized माळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीने अनोखी संकल्पना राबवत उपसरपंच पदी सौ सारिका बाळासाहेब मोरे...