पश्चिम महाराष्ट्राचं देवस्थान असणार्या दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा शनिवार दि.16/4/2022 रोजी होणार आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून यात्रा झाली नव्हती,त्यामुळे यावर्षी मोठ्या संख्येने भाविक जोतिबा यात्रेला येण्याची शक्यता आहे.सांगली,मिरज,सातारा,पुणे येथून येणारे भाविक माले मार्गे जोतिबा डोंगरावर येत असतात.गेल्यावर्षीच्या पावसामुळे माले-वाघबीळ रस्त्यावर दुतर्फा झुडपे वाढलेली आहेत.त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वळणांवरती वाहने एकमेकांसमोर येऊन अपघात घडत आहेत.
जोतिबा यात्रेला मोठ्या प्रमाणावर वाहने येणार असल्यामुळे या रस्त्यावर अपघातांची शक्यता असल्यामुळे ही झुडपे लवकरात लवकर काढण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान, कोल्हापूर चे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केलेली आहे.
“चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहनांची गर्दी पाहता अपघात होऊ नयेत म्हणून संबंधित विभागाने ही झुडपे त्वरित काढावीत- डॉ.अभिजीत जाधव अध्यक्ष रस्ते सुरक्षा अभियान,कोल्हापूर.