डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय व नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गावपातळीवर प्रथम प्रशिक्षण कार्यक्रम आज सुरवड येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी कृषी अधिकारी श्री.जी.पी सुर्यांवंशी यांनी सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन केले.डॉ.पंजाबराव देशमुख मिशन हे कृषी विभाग ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,पुणे प्रकल्प संचालक आत्मा ,पुणे यांचे वतीने अंमलबजावणी करण्यात येत आहे.या अभियानात नोंदणी केलेले गटांचे प्रशिक्षण कार्यक्रम कृष्णा मंगल कार्यालय सुरवड येथे संपन्न झाले.यावेळी सेंद्रिय शेती व अभियान याबद्दल तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री विजय बोडके यांनी माहिती दिली.श्री गणेश सूर्यवंशी यांनी सेंद्रिय शेती गट तयार करणे, शेतकरी कंपनी स्थापन करण्याची कार्य पद्धती याविषयी शेतकरी यांना मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या महाडीबी टी योजनेत अनुसूचित जाती, जमाती साठी मोठ्या प्रमाणात फळबाग,मागेल त्याला शेततळे ,प्रधानमंत्री कृषी सींचाई योजना मध्ये ठिबक सिंचन या योजनेतून अर्ज करण्याचे आवाहन श्री सूर्यवंशी यांनी केले.विविध कृषी विभगाच्या योजनांची माहिती श्री.कल्याण पांढरे प्रयेवेक्षक यांनी दिली.यावेळी कर्तव्यदक्ष कृषी सहाय्यक श्री. अतुल जावळे ,श्री .आण्णा कदम यांनी शेतकरी गट व त्यांच्या संघटन याची माहिती दिली.श्री.श्रीनिवास कोरटकर, श्री.विशाल घोगरे व इतर शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
Home Uncategorized मानवी व जमिनीचे आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीची शेतकऱ्यांनी कास धरावी- कृषी अधिकारी जी....