👉 निंबोडी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ
जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील गावोगावी पिण्याच्या पाण्याच्या योजना लवकरच पूर्णत्वास येणार असून,यासाठी सर्वतोपरी मेहनत घेत आहे त्यामुळे माझ्या माता- भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निंबोडी येथे बोलताना दिली.
निंबोडी ता. इंदापूर येथे आज ५ कोटी ८३ लाख रूपायांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन माजी राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे विकासरत्न आमदार मा दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते पार पाडला.यामध्ये पद्मविभूषण मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब सभागृह बांधण्यासाठी ५० लाख रुपये, जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ५० लाख रुपये तसेच ३ कोटी ८३ लक्ष अश्या विविध विकासकांचा यामध्ये समावेश आहे.
याप्रसंगी बोलताना श्री भरणे यांनी सांगितले की, जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या कुठेही तळा जाऊ न देता तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी नेहमीच प्रामाणिकपणे प्रयत्नशील आपण मंजूर आणलेल्या कामांचे विरोधकांनी कितीही श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तरी जनतेला खरी वस्तुस्थिती माहित जल जीवन मिशन ही योजना आपल्यासाठी महत्त्वाचे आहे या योजनेमुळे पिण्याच्या पाण्याच्या योजना मार्गी लागणार असून यामुळे महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे.तसेच बाकीच्या इतर कामांमुळे निंबोळी गावच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडल्याने नागरिकांना चांगल्या सुविधांचा लाभ होणार आहे.
Home Uncategorized माता-भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही