“माणसाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार फक्त बाबासाहेबांमुळे मिळाला-आमदार दत्तात्रय भरणे .

हजारो वर्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या दिन दुबळ्या समाजाला गुलामीच्या शोषणातून बाहेर काढून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाला असल्याचे गौरवोद्गार आमदार दत्तात्रय भरणे यांनी काढले.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त आज इंदापुर शहरामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आयोजित जयंती निमित्त आमदार दत्तात्रय भरणे महामानवास अभिवादन केले.याप्रसंगी बोलताना आ.भरणे म्हणाले की,आज परमपुज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण जग त्यांना स्मरण करतोय.खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य हे पीडित, शोषित,दलित,आदिवासी समाजाला आपले न्याय हक्क मिळवून देण्यासाठी खर्च केले असून त्यांच्यामुळेच आज प्रत्येकाला समानतेचा तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आहे.तसेच सामाजिक विषमतेच्या विरोधात त्यांनी प्रचंड मोठा संघर्ष उभा करून आपल्या देशातील पिढ्यानपिढ्या गुलामगिरीचे चटके सहन केलेल्या दिन दुबळ्या समाजाला खऱ्या अर्थाने संविधानिक हक्क मिळवून देण्याचे महान कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले असून त्यांच्या या कार्याची जाणीव समाजातील प्रत्येकाने ठेवून बाबासाहेबांचे आदर्शवादी विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी आमदार भरणे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here